Homeशहरपाकिस्तान वरील हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर नाव देऊन एकीकडे पंतप्रधान जगात आपल्या पक्षाची...

पाकिस्तान वरील हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर नाव देऊन एकीकडे पंतप्रधान जगात आपल्या पक्षाची प्रतिमा उजळत असताना पक्षातील काही नेतेच महिलांप्रती असंवेदनशील.. धाकड,कोंढरे, आणि नगर मधील तो..मेसेज कांडवाला

advertisement

अहिल्यानगर दिनांक 26 जून

एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू कश्मीर मधील पहलगाम मधील अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करून या मिशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले होते आणि महिलांचा मानसन्मान राखला होता.या मिशनचे प्रतिनिधित्व महिला लष्करी अधिकाऱ्यांनी केले होते एकीकडे पंतप्रधान महिलांना मान सन्मान देत असताना त्याच पक्षातील काही नेते मात्र महिलांबाबत असंवेदनशील दिसून येत आहेत.


मागील आठवड्यात पुणे येथे एक घटना घडली.भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी बंदोबस्तात असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याने फरासखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्याचप्रमाणे मागील महिन्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता त्यामध्ये भाजपचे नेते मनोहर धाकडच्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वरील अश्लील कारनामे जगासमोर आले होते यामुळे मोठा गोंधळ उडाला होता मनोहर धाकडवरही पोलिसांनी कारवाई केली होती,

आता नगर शहरातही असाच एक मेसेजचा प्रकार समोर आला असून एका महिलेला मेसेज करून त्रास देण्याचा कारनामा एका पदाधिकाऱ्याने केला आहे. मात्र अंधारात पाय धरून हे प्रकरण मिटवण्याचे सुरू असून हे प्रकरण अंधारात म्हटले तरी असे नराधम जगासमोर येणे गरजेचे आहे की जेणेकरून सर्वसामान्य महिला अशा लोकांपासून सावध राहतील एका महिलेला. मेसेज करून त्रास देण्याचा काम भिंगार मधील एका पदाधिकाऱ्याने केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पक्षाने अशा लोकांविरुद्ध तातडीने कारवाई करून हाकलपट्टी केली पाहिजे कारण पक्षातही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ता असतात अशा पदाधिकाऱ्यांमुळे महिला असुरक्षित राहू शकतात त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांची हाकलपट्टी होणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular