Homeराजकारणस्मिता अष्टेकर यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस हजर

स्मिता अष्टेकर यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस हजर

advertisement

अहमदनगर दि.२२ जुलै

अहमदनगर शहरातील काही आजी-माजी नगरसेवक शिवसेनेतून बंडखोरी केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर अहमदनगर शहरात शिवसेनेमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे या प्रकरणात शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे सुपुत्र नगरसेवक योगी गाडे यांचेही नाव प्रवेश करतानाचे वेळी एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर वर आल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत नगर शहरातील शिवसेना नगरसेवक आणि माजी महिला आघाडी प्रमुख स्मिता अष्टेकर यांनी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना जाब विचारत राजीनामाची मागणी केली होती.

याबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन जी खरी परिस्थिती आहे ती जाहीर करणार असल्याचे शशिकांत गाडे यांनी आश्वासन दिल्यानंतर जर या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीबद्दल समाधानी झाले नाही तर मी गाडे यांना काळेफासेल असा इशारा स्मिता अष्टेकर यांनी दिला होता. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर भिंगार पोलीस स्टेशनचे काही पोलिस आता माजी महिला आघाडी प्रमुख स्मिता अष्टेकर यांच्या घरी त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोहोचले असल्याची माहिती मिळाली आहे. भिंगार पोलीस स्टेशनचे पोलीस स्मिता अष्टेकर यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत .मात्र त्यांच्यावर काय कारवाई करणार किंवा त्यांना का ताब्यात घेतले याबाबत पोलिसांनी अद्याप काही माहिती दिलेली नाही.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular