Homeराजकारणस्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

advertisement

मुंबई दि. २६जुलै
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना आणि शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांचा गट एकमेकांवर रोज काहीना काही कुरघोडी करत आहे. अनेक नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट अशा भेटीगाठी घेत आहेत। त्यामध्येच आता थेट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सध्या शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेली आहे. अशातच स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना स्मिता ठाकरे यांचा शिवसेनेत वावर हा पावरफुल होता. नंतर उद्धव ठाकरेंच्या हाती निर्णयप्रक्रिया येऊ लागल्या नंतर, 2003 ला तर उद्धव ठाकरेंकडे पक्षच जवळपास सोपवला गेला, त्यानंतर मात्र स्मिता ठाकरे बाजूला सरत गेल्या.

स्मिता ठाकरे यांना राज्यसभेचं सदस्यपद हवं होतं. त्यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत तसं स्पष्ट म्हटलंय. मात्र, बाळासाहेबांना ते आश्वासन पूर्ण करता आलं नसल्यानं आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.

त्याचप्रमाणे स्मिता ठाकरे यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांची निर्मिती करून चित्रपट सृष्टीतही आपलं एक वेगळं वजन तयार केलं होतं. आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात हा एक चर्चेचा विषय झाला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular