पारनेर दि. १० जून –
अत्यंत चुरशीची आणि नाट्यमय घडामोडी घेत वनकुटे सेवा सोसायटीचा निवडणुकीचा निकाल लागला असून विद्यमान आमदार निलेश लंके गटाचा पराभव झाला आहे. कथित ऑडिओक्लिप त्या नंतर मतदानाच्या दिवशी एकाच मतदाराला दोन वेळा मतपत्रिका दिली गेल्याने झालेला गोंधळ त्या नंतर झालेला राडा यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती.
सेवा सोसायटीमध्ये आमदार लंके गटाचा दारूण पराभव झाला आहे. आमदार नीलेश लंके यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे वनकुटे गावचे सरपंच तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव अॅड. राहुल झावरे यांना सेवा सोसायटीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वनकुटे सेवा सोसायटीमध्ये डॉ. नितीन रांधवण गटाने एक हात्ती सत्ता मिळवत वनकुटे सेवा सोसायटी ताब्यात घेतली आहे.
निवडणुकी दरम्यान गोंधळ पहा व्हिडीओ
सेवा सोसायटीच्या निवडणुकीत खामकर मच्छिंद्र
रामभाऊ,मुसळे गणेश विलास, बुचुडे काशिनाथ किसन काळनर विठ्ठल पंढरीनाथ, गागरे ताराबाई भानुदास, केसकर भिवा नामदेव, औटी कौशिक भगवंता, गागरे अशोक जगन्नाथ, गागरे ज्ञानेश्वर बबन, गोरे सोनबा देवराम, पठारे मच्छिंद्र गंगाधर, वाबळे लक्ष्मीबाई पारुनाथ, औटी सुर्यभान कान्हू आणि हे उमेदवार विजयी झाले आहेत.
राहुल झावरे यांचा हा पराभव अत्यंत धक्कादायक असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे या निवडणूक वरून दिसून येत आहेत.सरपंच राहुल झावरे हे आगामी जिल्हा परिषद निवडणूक ढवळपुरी गटातुन लढवणार असून त्यांच्या या पराभवामुळे पुढील काळात त्यांना अत्यंत सावध होऊन पुढचे राजकारण करावे लागणार आहे.