अहिल्यानगर – आज दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर निषेध व्यक्त करण्यात आला.

जिजाऊ ब्रिगेडच्या मते हा हल्ला केवळ न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील नसून भारतीय संविधानावर झालेला हल्ला आहे. निवेदनात म्हटले आहे की, भूषण गवई आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर सरन्यायाधीश पदावर पोहोचले असून, त्यांच्या विरोधात जातीय व वर्णवर्चस्ववादी मानसिकतेमुळे अशा अपमानजनक घटना घडल्या आहेत.
याशिवाय निवेदनात शिक्षण व समाजासाठी कार्यरत असलेल्या सोनम वांगचूक यांच्यावर लादलेले चुकीचे गुन्हे मागे घेऊन त्यांना ताबडतोब जेलमधून सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव, मराठा सेवा संघ इंजिनियर सुरेश इथापे, राष्ट्रवादी महिला उपजिल्हाध्यक्ष सुनिता वाल्हेकर, शिवाजीराव साळवे राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष करुणा काळे, कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थितीत सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात हल्ला करण्याचा हा गंभीर प्रकार केवळ व्यक्तीवरच नाही तर भारतीय संविधानावरही झालेला हल्ला आहे. त्यामुळे हल्लेखोरांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई केली जावी. तसेच सोनम वांगचूक यांना लादलेले चुकीचे गुन्हे मागे घेऊन त्यांची त्वरित सुटका व्हावी. या प्रकारामुळे बहुजन समाजातील प्रतिभावंत व्यक्तींवरील जातीवादी त्रास स्पष्ट होत आहे आणि अशा घटनांवर राज्याने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.” समाजातील 12 बलुती व अठरा पद जातींना घेऊन जिजाऊ ब्रिगेड मध्ये कार्य करत करत असताना कुठल्याही समाजावरती अन्याय हा सहन करून घेतला जाणार नाही कुणीही खालच्या थराला येऊन एखाद्याला अपमानास्पद वागणूक दिली तर तेथे अन्यायाला वाचा नक्कीच फोडणार सर्व समाज बांधव व सर्व समाज संघटनांनी एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. तरच आपली वज्र मूठ बनेल हे अँड स्वाती जाधव यांचे वक्तव्य आहे
निवेदन सादर करताना ॲडव्होकेट स्वाती जाधव (जिल्हा अध्यक्ष), सुनिता वाल्हेकर (महिला उपजिल्हाध्यक्ष), करुणा काळे (उपजिल्हा अध्यक्ष), सोनाली वाघमारे , वंदना इथापे (कार्याध्यक्ष), ॲडव्होकेट सुनंदा तांबे (सचिव), ऊषा काळभोर (सचिव सह), शुभांगी निंबाळकर (सह संघटक), उषा शिंदे , स्वाती शेटे , जयश्री गिरवलकर , शारदा जगदाळे, राजश्री शितोळे ( प्रदेश कार्याध्यक्ष), डॉ. कल्पना ठूबे ,अंबिकाताई भिसे, स्वाती पवार, भारती दिवटे, सोनाली वाघमारे,जयश्री कुटे , डॉ. अलका पवार, योगिता कर्डीले, कार्याध्यक्ष तसेच इंजि सुरेश इथापे (मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष), बाबुराव महाडिक (कार्याध्यक्ष), औटी शंकर, निंबाळकर श्रीकांत व इतर मान्यवर उपस्थित होते.





