अहिल्यानगर दिनांक 11 मे
अहिल्यानगर शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असून नगर शहरात हे आसंस्कृत धंदे सुरू असून यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. ज्याप्रमाणे कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे काम काही लोक करत असताना आता स्पा च्या नावाखाली नसते उद्योग सुरू झाले आहेत.
लांडग्याच्या तोंडाला रक्त लागल्या प्रमाणे काही लोक असे धंदे करून पैसे कमवायचे काम करत आहेत. पुण्यासारख्या मेट्रोसिटी मध्ये स्पा सेंटर चालवले जातात मात्र स्पा सेंटर नावाखाली अनैतिक व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे. तेच लोन आता नगर सारख्या शहरात येऊ लागले आहे सर्वच ठिकाणी हा प्रकार चालत नाही मात्र ठराविक ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे इतर स्पा चालक विनाकारण बदनाम होतात. काही स्पा सेंटर नियमानुसार व्यवसाय करत असतील. मात्र यापैकी बहुतांश स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार चालत असल्याची माहिती आहे.
वाचत रहा.. पुढच्या भागात ..स्पा सेंटरच्या नावाखाली काय काय धंदे आणि कुठे चालतात हे धंदे