Home शहर अनधिकृत स्पा सेंटरचा सुळसुळाट… एखादी फाईल बाहेर आल्यानंतर पोलीस कारवाई करणार का?

अनधिकृत स्पा सेंटरचा सुळसुळाट… एखादी फाईल बाहेर आल्यानंतर पोलीस कारवाई करणार का?

9
Oplus_131072

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरात उच्चभ्रू वस्त्यांमध्ये आता स्पा सेंटर सुरू झाल्याने या स्पा सेंटरच्या आजूबाजूस राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे एकही स्पा सेंटर हे कोणत्याही नियमानुसार चालत नसून या स्पा सेंटरच्या नावाखाली काय उद्योग चालतात हे आता सर्वश्रूत झालेले आहे.

Oplus_0

पाईपलाईन रोड हा आता स्पा सेंटरचे हब म्हणून ओळखला जाऊ लागला असून एकविरा चौक, वाणी नगर, तसेच नगर मनमाड महामार्गावरील डवले हॉस्पिटल समोर, आणि झोपडी कॅन्टींग परिसरात असणाऱ्या नवीन झालेल्या एका मोठ्या उंच पोशिमारतीमधील चौथ्या मजल्यावर स्पा सेंटर सुरू झाले असून. या पैकी किती स्पा सेंटरला अधिकृत परवानगी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.मात्र परवाना नसतानाही एस्पा सेंटर कोणाच्या आशीर्वादाने चालतात हा एक गौडबंगाल आहे.
या स्पा सेंटरच्या नावाखाली आंबट शौकीन लोकांचे शोक पुरवण्याचं काम सध्या सुरू असून कोणत्याही नियमानुसार हे स्पा सेंटर सुरू आहेत याची चौकशी होणे गरजेचे आहे.

स्पा सेंटर मध्ये आलेल्या मुली या कुठून आणलेल्या आहेत. परप्रांतीय तसेच देशाबाहेरून काही मुली आल्यात का? याची चौकशी पोलिसांनी करणे गरजेचे असून स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला हा गोरख धंदा एके दिवशी एखादी फाईल बाहेर आल्यावर कळेल की या ठिकाणी नेमके काय सुरू होते.

अधिकृत स्पा सेंटरसाठी प्रमुख नियम आणि अटी:

भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, अधिकृत स्पा सेंटर चालवण्यासाठी स्थानिक महापालिका आरोग्य परवाना, अग्निशमन दल ना हरकत प्रमाणपत्र (NOC), पोलीस पडताळणी (PCC) आणि शॉप ॲक्ट लायसन्स अनिवार्य आहे. क्रॉस-जेंडर मसाजवर बंदी, कर्मचारी नोंदणी, सीसीटीव्ही अनिवार्य, आणि सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेचे पालन करणे आवश्यक आहे.कर्मचारी (थेरपिस्ट) प्रमाणित संस्थेतून प्रशिक्षित असणे आवश्यक आहे.
ग्राहकांचे नाव, पत्ता आणि आयडी पुरावा (आधार/पॅन) ठेवणे अनिवार्य आहे. यापैकी हे काही कागदपत्र नसल्यास स्पा सेंटरचा परवाना रद्द होऊ शकतो व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते मात्र अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या स्पा सेंटर कडे यापैकी किती कागदपत्र उपलब्ध आहेत याचा शोध घेणे ही गरजेचे आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here