Homeशहरउपोषण सुरू झाल्यावर मनपा प्रशासनाने जागेची मोजणी सुरू केली महानगरपालिकेला अध्यास माहित...

उपोषण सुरू झाल्यावर मनपा प्रशासनाने जागेची मोजणी सुरू केली महानगरपालिकेला अध्यास माहित नसल्याने स्मारक कोठे करणार

advertisement

अहमदनगर दि.२८ एप्रिल
अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा बसावावा अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर पुतळा बसवण्यासाठी सर्व प्रशासकीय मंजुरी मिळाली असताना महापालिका प्रशासनाच्या वतीने दिरंगाई होत असल्याने धर्मवीर संभाजी महाराज स्मारक कृती समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले. या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्या मागणीलाही मनपा प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याने अखेर शनिवारपासून धर्मवीर संभाजी महाराज स्मारक कृती समितीच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

उपोषण सुरू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती दुपारी महानगरपालिकेचे उपायुक्त डांगे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली मात्र त्यांच्या चर्चेत समाधान न झाल्याने सायंकाळच्या दरम्यान अभियंता रोहिदास सातपुते तसेच नगररचना विभागाचे प्रमुख अतिक्रमण विभागाचे प्रमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मात्र त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की अद्याप या स्मारकासाठी लागणारी जागाच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत नसल्याने सायंकाळी या ठिकाणची मोजणी करण्यास सुरुवात करण्यात आली.उपोषणकर्त्यांनी ताबडतोब या जागेची मोजणी करून त्या ठिकाणी कंपाउंड टाकावे अशी मागणी केली आहे त्यामुळे महानगरपालिका कर्मचारी आणि प्रशासन रात्री उशिरापर्यंत मोजणी करत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular