अहिल्यानगर दिनांक १७ डिसेंबर
आयुष्यात यश मिळवण्यासाठी जिद्द आवश्यक आहेच पण अपयशही कधीकधी आपल्याला अस्वस्थ करतात. पण हॉटेल सनी पॅलेसच्या संस्थापकाप्रमाणेच आपल्यामध्ये कष्टाळूपणा आणि विजयाची भूक असली पाहिजे. चांगल्या गोष्टी फक्त एका वळणावर आहेत, या विश्वासाने तुम्ही पुढे जात राहा हे हॉटेल सनी पॅलेस संचालक बाबूशेठ चिपाडे आणि सनी चिपाडे यांचे वडील मच्छिंद्र चिपाडे यांच्या उदाहरणावरून असे दिसून येते. चिपाडे बंधूंचे व्यवसायातील यश हे नक्कीच एखाद्यासाठी प्रेरणादायक आहे.
१५ डिसेंबर २००६ रोजी सुरु झालेल्या या हॉटेलला १५ डिसेंबर २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. अत्यंत सामान्य घरातून पुढे आलेल्या चीपाडे परिवाराने सनी पॅलेस च्या माध्यमातून अहमदनगर शहरातील खवय्यांच्या मनात एक घर केले आहे.हॉटेल सनी पॅलेस मध्ये इंडियन,पंजाबी, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदुरी, काँन्टीनेंटल, चायनीज,अशा सर्वच प्रकारच्या व्हेज-नॉनव्हेज डिशेसमधील चविष्ट-रुचकर अन्नपदार्थ मिळत असल्याने ग्राहकांना समाधान मिळते. हॉटेलची खासियत म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत संपूर्ण कुटुंब येऊ शकत असल्याने फॅमिली रेस्टॉरंट म्हणूनही या हॉटेलची ओळख निर्माण झाली आहे. येथील अन्नपदार्थ क्वॉलिटी आणि क्वाँटीटीच्या बाबतीत इतर हॉटेलच्या तुलनेत सरस असून ते किफायतशीर दरामध्ये उपलब्ध आहे.
येथील व्यवस्थापन आणि स्टाफ शिस्तबद्धपणे ग्राहकांना सेवा देतो, त्यांच्याकडे आपुलकीने लक्ष पुरवतो. हॉटेल सनी पॅलेस मध्ये नीटनेटकेपणा, टापटीपपणा आणि विशेषतः स्वच्छता काटेकोरपणे राखली जाते. त्यामुळेच येथे येणारे ग्राहक हॉटेलशी कायमचे जोडले जातात. येथे मिळणारी सुविधा आणि सेवा सर्वोत्तम असल्यानेच हॉटेल सनी पॅलेसने नगर शहराच्या जीवनात गौरवाचे स्थान प्राप्त केले आहे.
काही दिवसांपूर्वीच सनी पॅलेस या हॉटेलचे नूतनीकरण करण्यात आले असून आता लहान मुलांचे वाढदिवस त्याच बरोबर छोटे विविध घरगुती समारंभही या हॉटेलच्या परिसरात करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या समारंभाबरोबरच छोटे-मोठे वाढदिवस या ठिकाणी साजरे होत आहेत.