सुपा दि.१० जून
मुस्लिम समाजासह सर्व मानवजातीचे श्रद्धास्थान असलेले पैगंबर प्रेषित महंमद साहेब यांच्याबाबत भाजपच्या निलंबीत प्रवक्ता नुपुर शर्मा व नवीन जिंदल यांनी अपशब्द वापरले आहेत. त्यांचा आज परनेत तालुक्यातील सुपा गावातील सुपा मुस्लिम जमाअतने निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांना देण्यात आले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,
वरिल विषयान्वये आमच्या सुपा मुस्लिम जमाअत तर्फे तक्रार करण्यात येते कि नुपुर शर्मा हिने एका टि.व्हि. डिबेट मध्ये आमचे इस्लामचे (मुस्लिमांचे ) धर्मगुरु हजरत मुहंम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरले आहेत त्यामुळे आमच्या सुपा शहरातील संपुर्ण मुस्लिम समाजाकडुन याचा तीव्र निषेध केला जात आहे. या अर्जानुसार आमची साहेबांना व महाराष्ट्र सरकारला विनंती आहे कि अशा इस्लाम धर्म व धर्मगुरुविषयी व्देषाची मानसिकता ठेवणाऱ्या नुपुर शर्मा विरोधात कडक कायदेशिर कारवाही करण्यात यावी व तिला अटक करण्यात यावी .तसेच कायदेशीर कारवाईसाठी प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. असे नमूद करण्यात आले आहे.
शुक्रवार दुपारचा नमाज झाल्या नंतर सुपा येथील धार्मिक स्थळा बाहेरच सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सुपा गावासह आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या गावातील अनेक मुस्लीम बांधव उपस्थित होते.
नुपुर शर्मा व नवीन जिंदल यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर, सुपा गावातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.