Homeशहरभाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील स्वराली शित्रे हिने मिळवले 100℅ गुण

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील स्वराली शित्रे हिने मिळवले 100℅ गुण

advertisement

अहमदनगर दि.१७ जून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळातर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा घेण्यात आली नव्हती. पण यावर्षी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506 मुलं असून मुलींची संख्या 7, 49, 458 एवढी आहे.

 


अहमदनगर शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील स्वराली संजय शित्रे या विद्यार्थिनीने 100 टक्के मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकवण्याचा मान मिळवला आहे.

कोरोना मुळे दोन वर्ष शाळा आणि परीक्षा ऑनलाईन झाल्या होत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मागील वर्षी झालेल्या ऑफलाइन पेपर मधील मार्कांची सर्वांनाच उत्सुकता होती या वर्षी पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली असून अहमदनगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.77% इतका लागला आहे.

स्वराली संजय शित्रे हिचे वडील सरकारी ऑडिटर असून आई शिल्पा शित्रे या गृहिणी आहेत स्वरालीला आई वाडीलांसह शाळेतील सर्वच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून आज या यशाचा आनंद भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे प्राचार्य विलास दुगड यांच्या सह इतर शिक्षकांनी स्वरालीला पेढे भरवून व्यक्त केला . स्वरली शित्रे हिच्या बरोबरच विद्यार्थ्यांनी 90 टक्‍क्‍यांच्या पुढे मार्क मिळवले आहेत अशा सर्वच विद्यार्थ्यांचा सन्मान भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या वतीने करण्यात आला.

स्वराली शित्रे हिला मिळालेले गुण –
MARATHI (1ST LANG) – 093
SANSKRIT (2/3 LANG) – 100
ENGLISH (2/3 LANG)- 097
MATHEMATICS। – 100
SCIENCE & TECHNOLOGY- 100
SOCIAL SCIENCES – 100
TOTAL – $497 + 03/500
PERCENTAGE- 100.00

 

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular