अहमदनगर दि.१० ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील अंजूमने तरक्की उर्दू ट्रस्ट E 24 संस्थेच्या (चाँद सुलताना) नवीन संचालक मंडळाचा चेंज रिपोर्ट बदल अर्ज धर्मदाय आयुक्तांनी मंजूर केला असून तसे आदेश अहमदनगर विभागाच्या धर्मादाय उप आयुक्त,श्रीमती यु. एस. पाटील यांनी काढले आहेत. त्या नुसार आता नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले असून या नवीन संचालक मंडळाने पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे.
यामध्ये चेअरमन म्हणून सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहिम,व्हा. चेअरमन पदी खान समद वहाब,सेकेटरीपदी शेख तन्वीर चॉद,जॉईंट सेकेटरी पदी गुलजार हुसेन दिलदार हुसेन शेख ,जॉईंट सेकेटरीपदी सय्यद सादीक आरिफ ट्रेजरर म्हणून सौ.रेहाना रशिद अहमद शेख आदिंची निवड सर्वनुमते करण्यात आली आहे.तर विश्वस्तपदी शेख रशिद सुलेमान,बेग समीर मकसूद,शेख अकिल लियाकत, शेख गुलाम दस्तगीर अब्दुल गणी,सय्यद इसहाक अहमद,सय्यद जमीलोद्दीन शफीउद्दीन,शेख खालीद दिलदार हुसेन, तर स्वीकृत सदस्य म्हणून सय्यद अब्दुल वाहीद अब्दुल हमीद् ,सय्यद वहाब उमर यांची निवड करण्यात आली आहे.तर पदसिध्द विश्वस्त हे मुख्याध्यापक, चॉद सुलताना अॅग्लो उर्दु हायस्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलज हे असतात
तर जुन्या विश्वस्त मंडळातील जनाब मिर्झा सलातबेग अब्दुर्रज्जाकुप, सैयद अब्दुल मतीन अब्दुरह सैयद युसूफ गफुर,शमशेरखान शेरखान, शेख वलियोद्दीन बशीर साहब, हाजीमोहम्मद हनीफ हाजीजमाल ,हाजी मिराबक्ष अल्लाबक्ष,डॉ. शहाबुद्दीन गुलाबभाई पठाण, शेख चॉद लाल मोहम्मद, सैयद गफ्फार इमाम,सैयद अजगर अकबर याची नावे कमी करून नवीन विश्वस्त मंडळाची नावे समाविष्ट करावी याकरिता धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज दाखल करण्यात आला होता.
नवीन विश्वस्त मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नवीन विश्वस्त हे या संस्थेच्या उन्नतीसाठी आणि नाव लौकिक कमवण्यासाठी झटणार असून विद्यार्थ्यांसह संस्थेच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टीने विचार करणारी ही नवीन विश्वस्त मंडळांची बॉडी काम करेल असा विश्वास चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी व्यक्त केला आहे.