Homeशहरप्लॉट घेतला हजार स्क्वेअर फुट ताबा दोन हजार स्केअर फुटावर त्या अधिकाऱ्याने...

प्लॉट घेतला हजार स्क्वेअर फुट ताबा दोन हजार स्केअर फुटावर त्या अधिकाऱ्याने ताबा मारून केलेले अनाधिकृत बांधकाम

advertisement

अहमदनगर दि.७ मे
ताबा प्रकरण आता नवनवीन वळणे घेत असून ताबा म्हणजे फक्त जमिनीचा ताबा नाही तर या प्रकरणातून अनेक घोटाळे समोर येत आहेत. काळा पांढरा पैसे बाबत घोटाळा, जमीन एन.ए.न करता विक्री करणे, साठेखत करून पैसे न देता समोरच्या माणसाला अडवून ठेवणे,टपरी टाकून अतिक्रमण करून पैसे घेणे, खोटे दस्तऐवज करून ब्लॅकमेलिंग करणे, एखाद्या मोठ्या व्यवसायिकाची बांधकाम सुरू झाले की त्या ठिकाणी जाऊन धिंगाणा करू पैसे घेणे असे अनेक प्रकार या ताबा प्रकरणातून आम्ही समोर आणले आहेत.

नगर शहरातील बालिकाश्रम रोड भागातील असाच एक प्रकार समोर आला असून यामध्ये काही लोकांनी हजार स्क्वेअर फुट प्लॉट विकत घेतला असताना शेजारील मोकळ्या जागेवर कंपाउंड बांधून ताबा मारल्याचा आरोप मूळ मालकाने केला आहे.  आणि त्यावर घराचे बांधकाम केले आहे. विशेष म्हणजे महसूल खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे याठिकाणी घर असून घर बांधताना महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नसून महानगरपालिकेने सदर बांधकाम पाडण्याबाबत प्लॉट धारकांना पत्र पाठवले आहे.

याबाबत महानगरपालिकेकडे एका सामाजीक कार्यकर्त्यांसह मूळ जमीन मालकाने या बेकायदेशीर बांधकाम बाबत अनेक वेळा लिखित तक्रारी करूनही महानगरपालिकेने अद्याप पर्यंत फक्त नोटीस बजावण्याची भूमिका घेतलेली आहे.

महानगरपालिकेने नोटीस दिल्यानंतर एक महिन्याच्या आत हे बांधकाम प्लॉट धारकांनी स्वतःहून काढून टाकण्याची गरज असताना अद्यापही हे अनधिकृत बांधकाम जसेच्या तसे उभे आहे महानगरपालिकेच्या नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 ,53, 54 अन्वये महानगरपालिका फौजदारी गुन्हा दाखल करू शकते. मात्र अद्यापही महानगरपालिकेने हे पाऊल का उचलले नाही असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

सदर बांधकाम आणि इतर जागेबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने महानगरपालिका महसूल विभागाकडे पाठपुरावा केला आहे मात्र या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी असल्याने हे प्रकरण काही संथ गतीने पुढे जात असल्याचे समोर आले आहे.

क्रमशः

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular