Homeशहरताबा बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवर ताबा मारून चार कोटींची मागितली खंडणी.. ताबे मारण्याचे...

ताबा बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवर ताबा मारून चार कोटींची मागितली खंडणी.. ताबे मारण्याचे प्रकार सुरूच..

advertisement

अहमदनगर दि.१३ डिसेंबर
अहमदनगर शहरात ताबा हा प्रकार आता नवीन राहिलेला नाही अनेक उच्चभ्रू व्हाईट कॉलर असलेल्या लोकांसह, राजकारणी आणि गुंड यांच्याबरोबर काही विशिष्ट समाजाला हाताशी धरून दुसऱ्याच्या जमिनीवर ताबे मारण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.

अहमदनगर शहरातील विविध भागात असे ताब्याचे प्रकार उघडकीस आले होते यानंतर आता याचे लोन भिंगार परिसरातही गेले असून या ठिकाणी काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी ताबा मारून जागा मालकाला चार कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे अथवा आम्हाला दुसरीकडची एखादी जमीन आमच्या नावावर करून दे अशी धमकीही दिल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी नागरदेवळे येथील बांधकाम व्यावसायिक
मकरंद विलास देशमुख यांनी भिंगार पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देऊन सात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मकरंद देशमुख यांची यांचे मालकीचा नागरदेवळे
शिवारातील शेत गट नंबर 282/1,2,3 ब मधील प्लॉट नंबर 1,2,3,4 मधील 25 गुंठे प्लॉटमध्ये काही लोकांनी ताबा मारला असून याबाबत मकरंद देशमुख यांनी या ताबा मारणाऱ्या लोकांना आपल्या मालकीच्या जागेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता उलट त्या लोकांनी मकरंद देशमुख यांना धमकी देत ही जागा आमच्या नावावर करून दे नाहीतर आम्हाला चार कोटी रूपये दे हे जर जमत नसेल तर कापुरवाडी शिवारात आम्हाला नऊ एकर जमिन घेवून दे अशी मागणी केल्यामुळे मकरंद देशमुख यांच्या पायाखालची जमीन सरकली होती.
जर आम्हाला या ठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न केला तुझ्यावरच खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकीही या ताबा मारलेल्या लोकांनी मकरंद देशमुख यांना दिली. या प्रकारामुळे मकरंद देशमुख घाबरून गेले होते अखेर त्यांनी भिंगार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकारात गुन्हा दाखल केला असून भिंगार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मकरंद देशमुख यांनी कायदेशीर कारवाई करून आपली जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी ही जी विशिष्ट समाजातील लोकांना हाताशी धरून ताबा मारण्याची पद्धत नगरमध्ये सुरू झाली आहे ती सर्वसामान्य नागरिकांना घातक असून अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिक घाबरून गेला आहे. नगर शहराच्या आसपास सर्व जागांना सोन्याचे भाव आल्यामुळे असे ताबा मारण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र काही राजकारण्यांची अशा लोकांना साथ असेल तर मात्र सर्वसामान्य माणसाचं मात्र मरण होणार आहे हे निश्चित.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular