अहमदनगर दि. 6 ऑक्टोबर
आवाज महाराष्ट्र या पोर्टल द्वारे खऱ्या अर्थाने ताबा कशा पद्धतीने मारला जातो कशा पद्धतीने जमीन लुबडली जाते अशा वेगवेगळ्या पद्धती कोणाच्या माध्यमातून ताबा पद्धती राबवली जाते. यावर जवळपास पंधरा भागावरील “ताबा” या विषयावर मालिका सुरू केली होती. मात्र आता ताब्याच्या नावाखाली नुसती बोंबाबोंब सुरू असून सुपारी घेऊन ताबा ताबा ओरडण्याचा काम सुरू झाले का काय अशी परिस्थिती समोर येऊ लागले आहे.
ताबा म्हणजे दुसऱ्याच्या जमिनीवर बळजबरीने घुसून कोणतेही कागदपत्र अथवा पैसे न देता दुसऱ्याची जमीन लुबाडणे याला “ताबा” म्हणतात मात्र आता काही ठिकाणी वेगळेच प्रकार सुरू झाले आहेत काही लोक असे असतात ज्यांची जामीन प्लॉट त्यांच्या पूर्वजांनी विकलेला असतो हे त्यांना माहीत असते मात्र आता जमिनीचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने त्या माणसाला लालच सुटते आणि मग तो बळजबरी विकलेली जमीन आपलीच असल्याचे सांगत विकत घेतलेल्या माणसाने ताबा मारल्याची बोंबाबोंब करतो असे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस येऊ लागले आहेत आणि याला काही राजकीय लोक त्यांच्या राजकारणासाठी सपोर्ट करत असल्यामुळे याला वेगळेच वळण लागतं. मात्र हे असं प्रकरण म्हणजे लांडगा आला रे आला अशा म्हणी प्रमाणे होऊ लागले आहे. साप गेला तरी भुई धोपटण्याचे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यामुळे मात्र मूळ ताब्याचा प्रश्न मागे पडत चालला आहे. एखाद्याची विनाकारण बदनामी करायची असेल तर बळच कोणाचेही नाव घेऊन बोंबाबोंब करायचे आणि आपलं इंगित साध्य करून घ्यायचे असे प्रकार सध्या सुरू आहेत मात्र या मुळे खऱ्या ताब्यांकडे दुर्लक्ष होऊन गोरगरीब लोकांवर अन्याय सुरूच आहे.
काही लोकं तर ताबा ताबा म्हणायची सुपारीच घेतात का काय असं काम करताना दिसत आहेत. वस्तुस्थिती माहिती असताना आणि जागा मूळ मालकांनी दुसऱ्याला विक्री असताना समोरचा व्यापारी तो काही बोलू शकणार नाही भांडणार नाही आहे हे लक्षात आल्यावर त्याला धाक दाखवून तुझा ताबा आहे जर मी प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे दे असे प्रकार सध्या सुरू आहेत नगर शहरात काही ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मूळ ताबा प्रश्न बाजूला राहून आता राजकीय ताबा प्रश्न आणि त्याखाली पैसे कमवायचा धंदा सुरू झालीय का काय अशीच चर्चा सध्या नगरमध्ये सुरू आहे.