अहमदनगर दि.१ ऑगस्ट (सुथो)
अहमदनगर शहरात सुरू असलेल्या खून प्रकरणात शेवटी जी माहिती बाहेर येत आहे ती म्हणजे प्रॉपर्टीच्या कारणातून वाद होऊन अखेर त्याचा शेवट हा खुण करण्यापर्यंत झालेला आहे.”आवाज महाराष्ट्राचा” या वेब पोर्टल द्वारे मागील एक वर्षापासून “ताबा” या मालिकेच्या माध्यमातून अहमदनगर शहरात सुरू असलेल्या “ताबा” मारण्याच्या प्रकरणावर वेळोवेळी प्रकाशझोत टाकून नागरिकांसह पोलीस प्रशासनाला कल्पना देण्याचे काम सुरू होतं त्यावेळी लिहिलेले ताबा मालिका आता सत्यात उतरत आहे. कारण असे प्रकरण घडणार याचे भाकीत आम्ही आधीच केले होते. नगर शहरात अजूनही अनेक ताबा मारण्याचे प्रकार सुरू असून नगर शहरातील एक मोठा बांधकाम व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या जागांवर खोटे कागदपत्र करून ताबे मारण्याचे किंवा विनाकारण त्या जागामालकांना त्रास देण्याचे काम अजूनही करत आहे. काही वर्षांपूर्वी एका मोठ्या बांधकाम व्यवसायिकाच्या घरीच उपनिबंधक कार्यालयातील सर्व शिक्के आणि कागदपत्रे सापडली होती त्या बांधकाम व्यवसायिकाच्या घरातच जणू काही उपनिबंधक कार्यालय सुरू होतं का काय अशी परिस्थिती होती. त्याकाळी त्या बांधकाम व्यवसाय त्याने अनेक लोकांच्या नावांची स्टॅम्प आणि खोटे शिक्क्याने जागा आपल्याला दिल्याचं लिहून घेतले आहे.
दहा हजार रुपयांपासून ते लाख रुपयापर्यंत पैसे देऊन ते कागदपत्र तयार करून ठेवले आहेत कुठे प्लॉटचा व्यवहार झाला की त्या बांधकाम व्यवसायीक त्या जागेवर आपली मालकी असल्याचं सांगतो त्यामुळे अहमदनगर शहरात असे अनेक लेटीकेशन्स या बांधकाम व्यवसायाकाने करून ठेवले असून त्यामुळे अनेक चांगल्या लोकांना मनस्ताप झालेला आहे. त्यामुळे हा एक वेगळ्या प्रकारे ताबा मारण्याचा प्रकार समोर आला आहे.
आता जागेला मोठी किंमत आल्याने यामध्ये काही मोठमोठी लोक सामील होऊन या प्रकरणात हात घालून त्या जुन्या कागदपत्र द्वारे प्लॉट धारकांना वेठीस धरण्याचं काम सध्या अहमदनगर शहरात सुरू आहे.
वीस हजार पन्नास हजार रुपये देऊन स्टॅम्पवर अंगठे घेतलेले ते अंगठी खरे के खोटे माहित नाही कारण आता अनेक लोक मयत असल्यामुळे त्या कागदावर विश्वास कितीसा ठेवायचा हा एक मोठा प्रश्न आहे. असे कागदाचा बाहेर काढून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम सध्या नगर शहरात सुरू आहे. यामध्ये सुद्धा एखादा माथेफिरू प्लॉट धारक काहीही करू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
कारण आयुष्यभर कष्ट करून कमवलेली रक्कम एखाद्या प्लॉटमध्ये गुंतवायची आणि ज्यावेळेस प्लॉट खरेदी होईल आणि त्याचे स्वप्न पूर्ण होत असतानाच असा कोणीतरी माणूस येऊन ही जागा आम्ही काही वर्षांपूर्वीच घेतलेली आहे असे खोटे कागदपत्र दाखवून त्या माणसाला मानसिक त्रास देतो तेव्हा तो माणूसही कुठेतरी पेटून उठतो आणि त्याच्या हातून काहीही चूक घडू शकते असे प्रकार नगर शहरात सुरू असून या खोट्या लिटिकेशन द्वारे अनेकांची पिळवणूक सुरू आहे त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा ताब्यावरून काहीही घडू शकते हे तेवढेच सत्य आहे.