अहिल्यानगर दिनांक 8 जुलै
नगर मनमाड रोडवरील त्या जमिनीबाबत चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे एकीकडे ती जमीन खरेदी करणार असल्याची नोटीस दहा जून रोजी एका सायंदैनिकात आली होती. या नोटीसी मध्ये विद्यमान मालक म्हणून पारसमल मश्रीमल शाह यांचा उल्लेख असून त्या जागेचे वर्णन आणि ती मिळकत निर्वेध, निजोखमी असून या मिळकतीच्या व्यवहारापोटी मालकाने काही रक्कम स्वीकारली असल्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर या नोटिशीला उत्तर म्हणून खबरदारीची सूचना देण्यात आली असून यामध्ये या जमिनीचे मूळ मालक डायाभाई अब्दुल अजीज यांनी ती मिळकत शेख मतीन आलम बशिरूद्दीन यांना १६/०५/२०१६ रोजी हिबानामाच्या दस्ताद्वारे कायमस्वरूपी हस्तांतरित केलेली असल्याचा दावा या नोटीशीत करण्यात आला आहे.त्यामुळे ही मिळकत शेख मतीन आलम बशिरूद्दीन यांची असताना काही व्यक्तिंनी बेकायदेशीरपणे डायाभाई अब्दुल अजीज यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तिच्या मिळकतीचे १५/१०/१९९१ रोजीचे खोटे व बनावटी दस्त पारसमल मश्रीमल शाह यांच्या नावाने महसूल विभागाच्या मदतीने 34 वर्षांनी सातबारा उताऱ्यावर लावण्यात आल्याचे या नोटीसित नमूद करण्यात आले आहे. तसेच ही मिळकत बेकायदेशीरपणे विकण्याचा घाट घातला जात असून. ही मिळकत कोणी घेऊ नये असे आवाहनही या नोटीसद्वारे करण्यात आले आहे.

तसेच पारसमल मश्रीमल शाह यांच्याशी व्यवहार करू नये, कारण शहा यांना मिळकती मध्ये आणि बनावटी दस्तातील अन्य मिळकती मध्ये कोणताच हक्क व अधिकार नाही.अशी नोटीस गोपाल अग्रवाल अॅण्ड असोसिएटस् अॅडव्होकेटस् यांच्या वतीने देण्यात आली आहे.





