अहमदनगर दि.७ नोव्हेंबर – अहमदनगर महानगर पालिका क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत जागेवर अनधिकृत हॉस्पिटल व मेडिकल व्यवसाय थाटले गेले आहेत. कोणत्याही अटी व शर्तीची पूर्तता न करताच अनाधिकृत जागेमधील इमारतीमध्ये हॉस्पिटल व मेडिकल सुरु करण्यात आलेली आहेत यातील काही हॉस्पिटल व मेडिकल गेल्या १०- १२ वर्षापासून बांधकाम पूर्णत:चा दाखला, अग्नीशमनरोधक अटींची पूर्तता न करताच सुरु आहेत.त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.

याबाबत आम्ही अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थानिक प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार करून सदर बाबींचा पाठपुरावा केला. परंतु महानगर पालिका आयुक्त, अहमदनगर महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे सहायक आयुक्त, अतिक्रमण विभाग प्रमुख व मनपा आरोग्य विभाग सदर हॉस्पिटल व मेडिकल व्यावसायिकांना पाठीशी घालत आहेत. याबाबत आम्ही विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे करून लक्ष वेधले परंतु त्यांनीही याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.आम्ही आपणाकडे आपण नगर विकास मंत्री असताना दि. २३/०३/२०२२ रोजी पत्राद्वारे या प्रकरणाकडे आपले लक्ष वेधले होते. परंतु आजपर्यंत या बाबत ना नगरविकास खाते यांचेकडून काही कारवाई झाली ना स्थानिक महानगरपालिका प्रशासन याबाबत काही कारवाई करत नाही. त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण या प्रकरणामध्ये लक्ष घालून यासाठी जबाबदार स्थानिक महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे.
तसेच अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अनाधिकृत हॉस्पिटल व मेडिकल यांची परवाने तत्काळ रद्द करण्यात यावीत. अन्यथा आम्ही दि. २१/११/२०२२ रोजी आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका येथे आत्मदहन करणार आहे असा इशारा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने मागणी केली.
यावेळी शहर अध्यक्ष अमोल खरात, आशिष तापकीरे, योगेश आजबे, अमोल मोरे, तुषार शिदोरे, प्रदीप शेलार आदी उपस्थित होते.