HomeUncategorizedतेलीखुंट वरून चितळे रोड कडे जाणाऱ्या मार्गावरील पॉवर हाऊस शेजारील त्या जीवघेण्या...

तेलीखुंट वरून चितळे रोड कडे जाणाऱ्या मार्गावरील पॉवर हाऊस शेजारील त्या जीवघेण्या खड्डयाला नगरचा जीवघेणा मानबिंदू घोषीत करा नागरीकांची मागणी

advertisement

अहमदनगर दि.९ मे
नगर शहरातील रस्त्याबाबत आता सर्वांनीच लिहून झाले आहे शहरातील रस्त्यावरून महापालिकेला हजारो निवेदन आली असतील सत्ताधारी पक्षा बरोबर विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरून मनपा प्रशासनाला सुनावले आहे.मात्र शहरातील रस्ते आहे तसेच आहेत.

तुरळक रस्ते डांबरीकरण झाले आहे बाकी रस्ते धूळ आणि खड्डयांनी व्यापले आहेत.नगर शहरातील तेलीखुंट चौका पासून चितळे रोड कडे जाणाऱ्या रोड वर पॉवर हाऊसच्या अलीकडे नालाबंद मस्जिद शेजारी एक मोठा खड्डा असून ( नाली वरील चेंबर आहे मात्र आता हे चेंबर नावाला सुद्धा शिल्लक राहिलेले नाही) हा खड्डा आता ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करु लागला असून कारण हा खड्डा अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे अनेक वेळा अपघातही झालेले आहेत मात्र हा खड्डा महानगरपालिकेला बुजवता आला नाही हे एक मोठं चॅलेंज या खड्ड्याने महानगर पालिकेला दिले आहे असेच दिसून येतेय.

अनेक वेळा खड्डा ( चेंबर) बुजवण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न केला मात्र कायमस्वरूपी तोडगा निघून शकला नाही. त्यामुळे महानगरपालिकेने बुजवलेला हा खड्डा (चेंबर)दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकला नाही याचा अर्थ असा की काम किती चांगल्या दर्जाचे झाले असेल. या ठिकाणी व्यावसाय करत असलेल्या व्यावसायिकांनी सांगितले आहे. या छोट्या खड्ड्याचे रूपांतर आता भल्या मोठ्या खड्ड्यात झाले असून एखादा मोठा अपघात झाल्यानंतर किंवा खड्ड्यात पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग येईल का असा खोचक सवालही येथे राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे.

हा जीवघेणा खड्डा म्हणजे महानगरपालिकेच्या प्रशासना वर पडलेला एक मोठा डाग असून एवढे छोटंसं काम महानगरपालिका करू शकत नसेल तर मोठ्या कामाची काय अपेक्षा ठेवायची असेही उपहासात्मक टीका आता नागरिक करू लागले आहेत.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular