Homeराजकारणपाईपलाईन रोडच्या कामाची चौकशी करावी ठाकरे गट शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी कामात भ्रष्टाचार...

पाईपलाईन रोडच्या कामाची चौकशी करावी ठाकरे गट शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार

advertisement

अहमदनगर दि.१७ नोव्हेंबर

काही दिवसांपूर्वी झालेला पाईपलाईन रोड वादात सापडण्याची शक्यता असून शिवसेनेच्या वतीने या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

औरंगाबाद रोड नामदेव चैक ते श्रीराम चौक ते मनमाड रोड  रस्त्याचे काम झालेले आहे. हे काम रु 37000000.00 एवढया रकमेचे मंजुरी असुन त्यास प्रशासकीय मंजुरी ही प्राप्त आहे. परंतु सदरचे काम प्रत्याक्ष दर्शनी पाहिल्यास ते काम निविदाच्या अटी शर्ती प्रमाणे झालेले दिसून येत नसून  त्यात प्रचंड तफावत दिसुन येते .म्हणुन सदरच्या कामात जनतेची फसवणुक व लाखो रुपयांचा या कामात भ्रष्टाचार झालेला स्पष्ट दिसुन येत असल्याने  रस्त्याची सखोल चौकशी तातडीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या वेळी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव ,अंबादास शिंदे,संजय आव्हाड ,अरुण झेंडे,अभिजित अष्टेकर उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular