Homeराज्यठाणे पोलिसांच्या वेबसाईटवरून इशारा -भारतीयांनो, तातडीने जगभरातील मुस्लिमांची माफी मागा”

ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवरून इशारा -भारतीयांनो, तातडीने जगभरातील मुस्लिमांची माफी मागा”

advertisement

ठाणे दि.१४ जून
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा  यांनी मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भारतातही त्याच्या निषेधार्ह आंदोलनं करण्यात आली. पण सध्या ठाणे पोलीसांच्या वेबसाईवरचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यात “जगभरातील मुस्लिमांची” माफी मागावी असा मजकूर पाहायला मिळतोय. पण हे सगळं ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची वेबसाइटवर पाहायला मिळत असलं तरी हो पोलिसांच्या वतीने हा संदेश देण्यात आलेला नाही. तर ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली गेली. अन् त्यावरून हा मेसेज देण्यात आला. पण सध्या ही वेबसाईट पुन्हा पुर्ववत झाली आहे.

“सर्व भारतीयांना नमस्कार… तुम्ही पुन्हा पुन्हा इस्लामिक धर्माविषयी द्वेष पसरवत आहात. धर्माला अडचणीत आणत आहात. आमच्या धर्माचा, धर्मगुरूचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही सर्वांनी त्वरित जगभरातील मुस्लिमांची माफी मागा! आमच्या प्रेषिताचा अपमान झाला आहे. आता आम्ही शांत बसणार नाही”, असं संदेशात ठाणे पोलिसांच्या साईटवरून देण्यात आला आहे.

यातून सरकार कडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील शक्यता आहे. यामुळे अनेक गोपनिय माहितीच्या आधारे अदृश्य आरोपी सरकारची डोके दुखी वाढवू शकतात. ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular