अहमदनगर दि.७ सप्टेंबर
गणपती विसर्जन एक दिवसावर येऊन ठेपले असून पोलीस प्रशासनासह महानगरपालिका प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीची आणि गणपती विसर्जना बाबतची सर्व व्यवस्था चोख केली आहे. मात्र नगर औरंगबाद रोड वरील चिपाडे पार्क सनी हॉटेल शेजारील पुरातन बारव अद्याप महानगरपालिकेर साफ केले नाही. मागील वर्षीच्या अनेक गणपती मूर्ती अद्याप आहे ताशा अवस्थेत पडून आहे.
पाऊस झाल्याने झाडी झुडपी मोठ्या प्रमाणत वाढल्या असून महानगरपालिकेने अद्यापही साफसफाई न केल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.या ठिकाणी या परिसरातील अनेक नागरिक गणपती विसर्जन करत असतात. त्यामुळे या ठिकाणी साफसफाई करणे गरजेचे आहे. मात्र गणेश विसर्जन एका दिवसावर येऊन ठेपलेला असताना महानगरपालिकेला या गोष्टीचा विसर पडला का काय असंही दिसून येत आहे. महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी लक्ष घालून पुरातन बारवाची साफसफाई करून उद्यासाठी गणपती विसर्जनासाठी परिसर स्वच्छ करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.