.अहमदनगर दि.२३ सप्टेंबर
बनावट सोने तारण प्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत असून बनावट सोनेतारण कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगर शहर सहकारी बँकेमधील जवळजवळ 40 च्या आसपास लोकांनी बनावट सोनं ठेवून कर्ज प्रकरणे केली होती. या प्रकरणात जवळपास 40 च्या पुढे आरोपींचा आकडा गेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शहर सहकारी बँकेचा सोनेतारा विभागातील गोल्ड व्हॅल्यूअर अजय कपाले त्याचा साथीदार सुनील आळकुटे श्रीतेश रमेश पानपाटील रा.आलमगिर भिंगार, अहमदनगर , संदीप सिताराम कदम यांच्यावर आता कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को अर्बन क्रेडिट सोसायटीच्या शाखाधिकारी अनिल रामकिसन देशमुख यांनी केडगाव शाखेत सोनेतारण कर्ज प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या आरोपींना अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या गुन्ह्यात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये संत नागेबाबा मल्टीस्टेट कॉर्बन क्रेडिट सोसायटीच्या गुन्ह्यात आता यातील चार आरोपींना ताब्यात घेतले असून या आरोपींकडून संत नागेबाबा सोसायटीच्या संशयित खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे तसेच उद्या पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे , पोना.बापुसाहेब गोरे, पोकॉ गणेश ढोबळे, पोहेकॉ दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना सलिम शेख, बंडू भागवत, पोकॉ सुमित गवळी, करत आहेत.