Homeशहरकाळ आला होता मात्र वेळ नाही रस्त्यावरून जाणाऱ्या आजोबा नातीच्या अंगावर कोसळले...

काळ आला होता मात्र वेळ नाही रस्त्यावरून जाणाऱ्या आजोबा नातीच्या अंगावर कोसळले मोठे झाड मात्र ऍड विक्रम वाडेकर यांच्या सतर्कतेमुळे वाचले तीन वर्षीय मुलीचे प्राण

advertisement

अहमदनगर दि.२१ जून
काळ आला मात्र वेळ नाही असाच काहीसा प्रकार उपनगरातील कोहिनूर मंगल कार्यलया समोर एका तीन वर्षीय मुलगी आणि तिच्या पासष्ट वर्षीय आजोबांबाबत घडला आहे.

अहमदनगर शहरात आज दुपारी पावसाने हजेरी लावली त्याचबरोबर प्रचंड वारेही वाहत होते सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पारिजातक चौक ते एकवीरा चौक दरम्यान असलेल्या रोडवरून एक पासष्ट वर्षीय आजोबा आपल्या तीन वर्षीय नाती सोबत जात असताना अचानक पणे रस्त्याच्या कडेला असलेले प्रचंड मोठे झाड कोसळले आणि या घटनेमध्ये आजोबा आणि नात झाडाखाली अडकले होते.

सुदैवाने आजोबांच्या अंगावर झाडाचे खोड पडले नाही मात्र तीन वर्षीय मुलीच्या पाय झाडाच्या प्रचंड खोडा खाली अडकले होते. याचवेळी नगर शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ विक्रम वाडेकर ये सुद्धा त्या ठिकाणाहून जात होते त्यांच्या गाडी समोरच हे झाड पडले आणि तेही या घटनेत बालंबाल वाचले. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या नागरिकांना बोलवून 15 ते 20 नागरिकांच्या मदतीने प्रचंड असे मोठे झाड त्या तीन वर्षीय मुलीच्या पायावरून काढले आणि तिला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवून दिले या घटनेमुळे असेच म्हणावे लागेल काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular