अहमदनगर दिनांक 17 जुलै
नगर शहरात चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला असून दुचाकी चोरांबरोबर आता मोबाईल चोरीचे प्रमाणही वाढले आहे .नगर शहरातील तारकपूर बस स्टॅन्ड समोरील रोडवर साडेनऊच्या सुमारास एक घटना घडली असून या घटनेत मोबाईलवर बोलणाऱ्या एका युवतीच्या हातातून बळजबरीने मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याचा प्रकार घडला आहे.
ती तरुणी पत्रकार चौकाकडून डिएसपी चौका कडे जात असताना मोबाईलवर फोन आल्यानंतर गाडी थांबून ती फोनवर बोलत होती तेवढ्यात समोरून आलेल्या एका दुचाकी स्वराने त्या तरुणीच्या हातातून मोबाईल हीसकावण्याचा प्रयत्न केला मात्र त्या तरुणीने मोबाईल घट्ट पकडल्यामुळे त्या चोरट्याने तरुणीला मारहाण करून मोबाईल पळवून गेला आहे. अत्यंत वाहतुकीच्या रस्त्यावर ही घटना घडली असून चोरांना कोणाची भीती उरली नसल्याचं या प्रकरणावरून दिसून येत आहे.