Home शहर प्रोफेसर कॉलनी चौकातील महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील बोटावर मोजण्याचे मूळ मालक बाकी सर्व...

प्रोफेसर कॉलनी चौकातील महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील बोटावर मोजण्याचे मूळ मालक बाकी सर्व पोटभाडेकरू लवकरच होणार कारवाई .

अहमदनगर दि.२१ नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील उपनगरातील मुख्य चौक असलेल्या प्रोफेसर कॉलनी परिसरात महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेले व्यापारी संकुल अत्यंत जुने झाले असून या व्यापारी संकुलात अनेक मूळ गाळेधारकांनी आपले गाळे विकून पोट भाडेकरू ठेवले आहेत. याबाबत अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने या पोट भाडेकरूंनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली असून लवकरच या ठिकाणी नवीन व्यापारी संकुल उभारले जाण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.
अहमदनगर महानगरपालिकेच्या दप्तरी मूळ गाळेधारकांची जी नावे आहेत यापैकी बोटावर मोजण्या इतके गाळेधारक या ठिकाणी अद्यापही आपला व्यवसाय करत असून इतर गाळेधारकांनी आपले दुकाने विकली आहेत.

महानगरपालिकेच्या दप्तरी असलेली मूळ गाळधारकांची नावे

भरत कुकरेजा,दुर्गा कुकरेजा, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, प्रदीप सोलट, प्रकाश अर्जुनराव सोलट, सचिन देविदास शीलवंत ,चेअरमन रावसाहेब पटवर्धन सहकारी पतसंस्था, दिगंबर नाना, संतोष लांडगे, नारायण बुंदेले ,नवनीत सहकारी संस्थेचे चेअरमन अनेचा, कार्यकारी अभियंता एम एस सी बी, मनपा कार्यालय ,यशवंत ग्राहक भांडार चेअरमन मंगलाराम, मंदाकिनी गडीलकर,नेमीचंद गांधी ,नितीन गांधी, महावितरण कार्यालय ,वर्षा वाडेकर सुनीता परदेशी, अशोक परदेशी, लक्ष्मण हार्दवाणी, राजेंद्र घोंगडे, दीपक सासवडे ,धर्यशील वाडेकर,

अशा प्रमाणे महानगरपालिकेच्या दप्तरी मूळ मालकांची नावे असून यापैकी बहुतांशी मूळ मालक या ठिकाणी व्यवसाय करत नसल्याने महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पोटभाडेकरू महानगरपालिकेच्या जागेवर हक्क सांगू शकत नसल्याने आता न्यायालयाच्या निकाला नुसार पुढील कारवाई लवकरच होणार आहे अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version