HomeUncategorizedविवाहित तरुणीचा विनयभंग करून ॲसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या फैजान बागवानवर दाखल...

विवाहित तरुणीचा विनयभंग करून ॲसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या फैजान बागवानवर दाखल असलेल्या गुन्ह्यात “या” गंभीर कलमाची वाढ

advertisement

अहमदनगर दि .१९ सप्टेंबर

अहमदनगर शहरातील दिल्लीगेट भागात रविवारी रात्री एका विवाहित तरुणीला ॲसिड टाकून (Acid attack) मारण्याची धमकी देण्यात आली या मागची पार्श्वभूमी अशी की यातील आरोपी मागील दोन महिन्यापासून या विवाहित तरुणीच्या मागे पाठलाग करत होता मात्र त्याची मजल थेट या तरुणीला छेडछाड करून धमकी देत गाडीवर बसून फिरायला करण्याची मागणी करण्यापर्यंत गेली होती . तसेच आली नाही तर ऍसिड टाकण्याची धमकीही या आरोपीने त्या तरुणीला दिली होती. याप्रकरणी आता त्या विवाहित तरुणीच्या फिर्यादी वरून  तोफखाना पोलीस ठाण्यात ८१२/२०२२ भादवि क. ३५४,३५४(ड), ५०४,५०६ प्रमाणे फैजान कलीम बागवान या तरुणावर  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील आरोपी फैजान बागवान याच्यावर नगर शहरातील कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असून विनयभंग करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असे गंभीर होणे दाखल असल्यामुळे आता त्याच्यावर तडीपार करण्याची कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. तसा प्रस्तावही आता तोफखाना पोलीस करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर या तरुणीच्या विनयभंगाच्या आणि ॲसिड (Acid attack)टाकण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी 307 हे कलम वाढवले आहे. झालेल्या गुन्ह्यामध्ये फैजान याच्यावर 307 हे कलम लावण्यात आले नव्हते मात्र फैजान याने पीडित तरुणीच्या अंगावर गाडी घालून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता असं फिर्यादीमध्ये नमूद असल्याने हा कलम वाढवण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular