अहमदनगर दि.३० ऑगस्ट
अहमदनगर शहरात सध्या सुपारी (Betel)देण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे.(full swing) सुपारी द्या आणि बदनामी करून मग तडजोड करून समोरच्या माणसाला पवित्र करून त्याच्याकडून फायदा करून घ्या असा काहीसा प्रकार सध्या नगर शहरात सुरू असून यामुळे मात्र भविष्यात मोठा स्फोट होऊ शकतो.
नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका जनतेसाठी चोवीस तास उघडे असणाऱ्या आणि त्या ठिकाणी जनतेचे कायम संपर्क रक्षण करण्यासाठी असणाऱ्या चित्रपटगृहा समोरील कार्यालयात (office) हा प्रकार सध्या जोरात सुरू आहे. या ठिकाणी काम करणारे तीन (three) जणांचे गट एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सध्या फक्त कारण पाहत आहेत. मात्र यामुळे त्यांचे हे लक्षात येत नाही की भविष्यात एक ना एक दिवस हे गोल रिंगण आपल्यावर येऊ शकते. दुसऱ्याला अडकवण्याच्या नादात एक दिवस आपणही फसू शकतो. एकमेकांची नोकरी कशी अडचणीत येईल किंवा वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर कसे नाराज होतील यासाठी चांगली फिल्डिंग लावली जाते. एखादी चूक झाली की ती बरोबर बाहेर पोहोचवली जाते.अनेक गोपनीय माहिती काही ठराविक लोकांना बरोबर पोहचवली जाते त्या साठी एक खाजगी टोळकं कार्यरत आहे. आणि मग तिथून पुढे खेळ सुरू होतो तो बदनामीचा,
बदनामी झाल्यानंतर बदनामी करणारा हळूच कुठेतरी मध्यस्थीच्या मार्फत बदनामी झालेल्या कडून दीप लावून प्रसाद घेतो आणि बदनामी करण्यासाठी त्याला आधीच मलिदा मिळालेला असतो. सध्या सोशल मीडिया हे साधन बदनामी साठी चांगलंच फायदेशीर ठरत आहे. या अशा जिरवा जिरवीच्या प्रकरा मुळे मात्र एके दिवशी वरिष्ठ अधिकारी गोत्यात येऊ शकतात. सध्या ते कार्यालय या ना त्या कारणामुळे चांगलेच चर्चेत आहे. सुपारी द्या आणि वाटेतील काटा दूर करा असाच काहीसा फंडा या कार्यालयात सुरू आहे.मात्र यामुळे सर्वच कार्यालयाची बदनामी होत असून चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या प्रकरणाचा त्रास होत आहे.त्या मुळे सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक ना एक दिवस आपण पडतच असतो.