Homeजिल्हापोलीस निरीक्षक बकालेच अखेर निलंबन नगर शहरात ठीक ठिकाणी होणार बकाले विरुद्ध...

पोलीस निरीक्षक बकालेच अखेर निलंबन नगर शहरात ठीक ठिकाणी होणार बकाले विरुद्ध आंदोलन

advertisement

जळगाव दिनांक 15 सप्टेंबर

जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक (
(Police Inspector) किरण कुमार बकाले यांनी फोनवर बोलताना मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता किरण कुमार बकाले यांच्यावर कारवाई करणार यासाठी मागणी होत आहे. अनेक मराठा संघटना याबाबत आक्रमक झाल्या असून ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर किरण कुमार बाकले यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली होती. त्यांची बदली कंट्रोल रूममध्ये करण्यात आली होती.मात्र महाराष्ट्रातील मराठा संघटनांचा संताप पाहता नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी. शेखर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असून पोलीस उपाधीक्षक यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर सविस्तर अहवाल लवकरात लवकर पाठवावा, असंही विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी शेखर यांनी पारित केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

या प्रकरणानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती
यांनी सुद्धा ट्विट करत अशा लोकांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती. तसेच विविध मराठा संघटना आज रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. अहमदनगर शहरातही विविध मराठा संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असून काही संघटना किरण कुमार बकाले यांच्या प्रतिमेला जोडे मरो आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular