Homeक्राईमसिव्हिल हॉस्पिटल परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांना तोफखाना पोलीसांनी पकडले

सिव्हिल हॉस्पिटल परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांना तोफखाना पोलीसांनी पकडले

advertisement

अहमदनगर दि.१७ सप्टेंबर

अहमदनगर शहरातून मोटरसायकल चोरीचं सत्र सुरूच आहे .अनेक ठिकानी सीसी टीव्ही मध्ये हे चोरटे कैद झाले आहेत त्या आधारावर पोलीस तपास करत आहेत. नगर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून काही दुचाकी चोरी गेल्या होत्या या पत्करणी तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा नोंदवण्यात आला होता.

मोटर सायकल चोरीचा गुन्ह्याचा तपास करत असताना तसेच अहमदनगर शहरातून चोरी गेलेल्या विविध मोटरसायकलींचा तपास करत असताना सिविल हॉस्पिटल येथील सिक्युरिटी गार्ड यांना पोलिसांनी सूचना देऊन संशय आलेल्या व्यक्तींबाबत पोलिसांना कळविण्यात सांगितले होते. त्यानुसार एक व्यक्ती सिविल हॉस्पिटल समोर लावलेल्या दुचाकींना चावी लावून कुलूप उघडते का याची तपासणी करताना संशयितरित्या आढळून आल्याने सिक्युरिटी गार्ड पुणे याबाबत पोलिसांना कळवले होते. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात धाव घेऊन त्या संशयित इसमास ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता तो पाथर्डी तालुक्यातील कासारवाडी येथे राहणार असून नितीन उमेश कासार असे त्याचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्याचा साथीदार सचिन संजय मरकड यांनी मिळून चोरी केलेली हिरो होंडा स्प्लेंडर ही दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. या दोन दुचाकी चोरट्यांकडून अजूनही काही चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशन मधील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular