Homeजिल्हानागरिकांना ताटकळत ठेवत अधिकारी कर्मचाऱ्यांचे सरकारी कार्यालयातच बर्थडे सेलिब्रेशन व्हिडिओ होतोय व्हायरल

नागरिकांना ताटकळत ठेवत अधिकारी कर्मचाऱ्यांचे सरकारी कार्यालयातच बर्थडे सेलिब्रेशन व्हिडिओ होतोय व्हायरल

advertisement

अहमदनगर दि.९ नोव्हेंबर
भूमी अभिलेख कार्यालयातील (सिटी सर्व्हे ऑफिस) एक अजब प्रकार उघडकीस आला असून या ठिकाणी कार्यालयातच कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत एका अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा होत असतानाचे छायाचित्र आणि व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. एकीकडे संपूर्ण कार्यालय रिकामे असून सर्व कर्मचारी अधिकारी वाढदिवस साजरा करत आहेत तर जनता मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामासाठी वाट पाहत ताटकळत उभे असल्याचे चित्र या व्हिडिओमधील दिसून येत आहे.

सरकारी कर्मचारी अधिकारी  हा माणूसच असतो त्यांनी वाढदिवस साजरा करणे त्याचा हक्क आहे मात्र हा वाढदिवस कामकाजाच्या वेळेत साजरा न करता जेवणाच्या सुट्टीत अथवा घरी साजरा करणे योग्य असते. मात्र कामासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत ठेवून वाढदिवस साजरा करणारे हे कोणत्या नियमात बसते एक मोठा प्रश्न आता या व्हिडिओमुळे समोर आला आहे.

हा व्हिडिओ अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी चित्रित केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या ठिकाणी कामकाज सोडून नागरिकांना ताटकळत ठेवत वाढदिवस साजरा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी संदीप भांबरकर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहेत.सामान्य नागरिक छोटा-मोठ्या कामांसाठी चकरा मारून थकून जातो मात्र कर्मचारी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत आणि सरकारी कार्यालयात कामाच्या वेळेस वाढदिवस साजरा करण्यासाठी बरोबर वेळ भेटतो असाही असावा आता सोशल मीडियावर नागरिक विचारू लागले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular