अहमदनगर दि.२२ ऑक्टोबर
राजकारणात कधी काय होईल हे कधीच सांगता येत नाही कोणता नेता रात्रीतुन कोणत्या पक्षात प्रवेश करेल हे त्याच्या जवळच्या कार्यकर्त्याला ही माहीत नसते. निवडणूक जवळ आली अनेक नेत्यांचे पक्षांतर होत असते दिवसभर एका पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरत असलेला नेता रात्रीतून दुसऱ्या पक्षाचा झेंडा कधी हाती घेतो हे कोणाला कळतही नाही.
सध्या महाराष्ट्रात तरी इलेक्शन नाही मात्र ईडी कारवाईच्या भीतीने पक्षांतर होत असल्याचे आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे सेनेचे नेते वारंवार करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिंदे गट ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये नेत्यांची आवक जावक जोरात सुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि काही काळापासून राजकारणापासून काहीसे अलिप्त दिसत असलेले दादाभाऊ कळमकर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ते गेल्याच या फोटोवरून दिसून येत आहे. त्यांच्या मागे भाजपचे कमळ चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक तर्कवितर्क या फोटोवरून लावले जात आहेत. कारण सध्या दादाभाऊ कळमकर हे सक्रिय राजकारणा पासून थोडे अलिप्त असून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर फार कमी वेळा ते दिसून आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहेत.
मात्र या फोटोचे सत्य काही वेगळेच असून दादाभाऊ कळमकर यांचे मूळ गाव पारनेर तालुक्यात असल्याने आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. आणि पारनेर तालुक्याशी त्यांचे नाते घट्ट असल्यामुळे पारनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते हे दादाभाऊ कळमकर यांच्या जवळचे आहेत. पक्षीय राजकारण विसरून दादाभाऊ कळमकर हे नेहमीच नेत्यांशी जवळीक साधून असतात.
हा फोटो भाजपाचे युवक अध्यक्ष सतीश मैड यांच्या कार्यालयातील असून औपचारिक भेट म्हणून काही कामानिमित्त दादाभाऊ कळमकर सुप्यातून जात असताना ते त्या कार्यालयात गेले होते अशी माहिती मिळतेय तसेच यावेळी त्यांच्या सोबत पद्मश्री पोपटराव पवार हे सुद्धा उपस्थित होते मात्र हे दोघेही काही इतर कामानिमित्त या ठिकाणी गेले होते या फोटोशी आणि दादाभाऊ कळमकर तिथे जाण्याशी राजकारणाचा कोणताही संबंध नाही. मात्र सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होतोयआणि या फोटोची चांगलीच चर्चा होतेय.