अहिल्यानगर दिनांक ९ नोव्हेंबर
अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेवानिवृत्त आर्मी सुभेदाराच्या घरी चोरट्यांनी चोरी करून तब्बल नऊ लाखांच्या आसपास सोने चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. आठ दिवस उलटून जाऊनही पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले नाही.

घटनेची हकीकत अशी की सेवानिवृत्त आर्मी सुभेदार असलेले पांडुरंग धोत्रे हे बुरुडगाव रोडवरील नक्षत्र मंगल कार्यालयाच्या पाठीमागे राहत असून. 26 ऑक्टोबर रोजी पांडुरंग धोत्रे हे आपल्या पुणे येथे राहत असलेल्या मुलाकडे दिवाळी सणानिमित् गेले होते. पुणे येथे जात असताना त्यांनी आपल्या घराची चावी त्यांच्या शेजाऱ्यांकडे दिली होती.तसेच घरातील सर्व लाईट चालू करून ठेवल्या होत्या. मात्र दोन नोव्हेंबर रोजी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या केदारे यांनी धोत्रे यांना फोन करून तुमच्या घरातील लाईट बंद आहेत अशी माहिती दिली. लाईट कशा मुळे बंद आहेत त्या बाबत धोत्रे यांनी तुम्ही जाऊन पाहून या असे सांगितले. त्यावेळी धोत्रे यांच्या शेजारी राहत असलेल्या केदारे यांनी धोत्रे यांच्या घराकडे जाताच त्यांना घराच्या दरवाजाला असलेला कडी कोयंडा तुटलेला दिसल्याने आणि घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. आणि त्यांनी हा प्रकार धोत्रे यांना सांगितला .ही घटना समजतात पांडुरंग धोत्रे यांनी तातडीने नगर गाठले आणि आणि त्यांना लक्षात आले की आपल्या घरी चोरी झालेली आहे.
त्यानुसार पांडुरंग धोत्रे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दिली असून. पांडुरंग धोत्रे यांच्या घरातून सोने चांदीसह रोख रक्कम अशी जवळपास नऊ लाख 39 हजार रुपयांची रक्कम चोरीला गेलेली आहे.
चोरीची घटना घडून तब्बल नऊ दिवस झाले असून. कोतवाली पोलीस स्टेशनच्या शोध पथकाला अद्यापही कोणत्याही धागेद्वारे मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोतवाली शोध पथक.यांच्या समोर चोरट्यांचा एक मोठं आव्हान असून या घटनेचा तपास लवकरात लवकर लावावा अशी मागणी धोत्रे कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत आहे.





