अहमदनगर दि.१४ सप्टेंबर
बुराहननगर येथीl अॅड. अभिषेक विजय भगत
यांच्यावर तोफखाना पोलिस स्टेशन येथे खोटा अँट्रोसिटी दाखल झालेला गुन्हा चौकशी करून रद्द करावा अशी मागणी आज राहुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या सह नगर तालुका आणि नगर शहरातील शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
अभिषेक विजय भगत हे वकील असून बुन्हाणनगर देवी मंदीराचे पुजारी आहेत. ज्या दिवशी ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी बुन्हाणनगर देवी मंदीर
ट्रस्ट संदभात धर्मदाय आयुक्त कार्यालयात सुनावणीसाठी हजर होते. यावेळी ज्या लोकांनी भगत यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला ते फिर्यादी धर्मदाय आयुक्त कार्यालयात त्यांचा केसशी कुठलाही संबंध नसताना बुऱ्हानगर येथील भाजपच्या काही राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि जाणिवपूर्वक खोट्या गुन्हयाचा बनाव व कट रचण्याकामी त्यांना पाठविले असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
याप्रकरणी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स तपासणी करण्याची आवश्यकता असून भगत यांच्यावर कट कारस्थान करून खोटा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याने खोटा गुन्हा रद्द करावा आणि त्यांना पोलीस संरक्षणाची मागणी ही यावेळी शिष्टमंडळाने केली आहे या शिष्टमंडळात शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर,दिलीप सातपुते, रोहिदास कर्डिले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, गिरीश जाधव, केशव बेरड, संग्राम कोतकर, संदीप बांबरकर, आदींचा समावेश होता.