Homeजिल्हासंगमनेर तालुका, राजूर, बेलवंडी,भरोसा सेल पोलीस ठाण्यात नवा गडी नवे राज्य आर्थिक...

संगमनेर तालुका, राजूर, बेलवंडी,भरोसा सेल पोलीस ठाण्यात नवा गडी नवे राज्य आर्थिक गुन्हे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन अधिकाऱ्यांची बदली

advertisement

 

Transfer of two officers of State Financial Offensesand Local Crimes Branch to Bharosa Cell Police Station, Sangamner Taluka, Rajur, Belwandi, Nawa Gadi Nawa

अहमदनगर दि.११ नोव्हेंबर

जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पदभार घेतल्या नंतर जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या जागेवर पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेत(Financial Offenses) नियुक्तीस असलेले पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड यांची बदली(Transfer) संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात(Sangamner Taluka)करण्यात आली आहे.तर स्थानिक गुन्हे शाखेत(Local Crimes Branch) नियुक्तीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांची राजुर(rajurkar) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. मानवसंसाधन शाखेचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांची बेलवंडी(belvandi) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. मानवसंसाधनचा अतिरिक्त पदभार निरीक्षक बाजीराव पोवार यांच्याकडे देण्यात आला आहे. भरोसा सेलचे निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची बदली शिर्डी (shirdi) साई मंदिर सुरक्षा  येथे करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी होतात याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे. कारण मध्यंतरीच्या काळात राज्य सरकार बदलल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्याच नव्हत्या त्यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्यामुळे ते बदलीच्या प्रतीक्षेत आहेत तर काही विनंती बदल्या सुद्धा प्रतीक्षेत असून आता या बदल्यांना कधी मुहूर्त मिळतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular