Home शहर नगर जिल्ह्याचा 19 वर्षे खालील मुलींचा क्रिकेट संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना ...

नगर जिल्ह्याचा 19 वर्षे खालील मुलींचा क्रिकेट संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने क्रिकेटपटू मुलींना शुभेच्छा देऊन केला सत्कार

अहमदनगर दि.४ सप्टेंबर:

महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशने(maharashtra Cricket Association)पहिल्यांदाच 19 वर्षे खालील मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे सोलापूर(solapur) येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा संघ रवाना झाला आहे यावेळी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (ahmednager District Cricket Association)व तीने महिला क्रिकेटपटूंचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशने 19 वर्षाखालील महिला क्रिकेटपटूंचे निवड केली कर्णधार पदी संगमनेरच्या सोराली कासार, पाथर्डी जितेश्री डमाळे, पाथर्डी प्राजक्ता लिपारे, नगर श्रुतिका दुलय, शिर्डी स्नेहल लोखंडे,नगर श्रावणी भालेराव, नगर दर्शना काठेड, नगर ऋतुजा जपकर,नगर आकांक्षा बोरुडे,संगमनेर आदिती राऊत, नगर प्रियंका पालवे, नगर समृद्धी शिंदे, श्रीरामपूर सायली काळे, राहुरी शारदा बेल्हेकर, नगर स्वामिनी बेल्हेकर, या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्हा क्रिकेट  असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय 19 वर्षीय खालील महिला क्रिकेटपटूचा सत्कार करून संघाला  शुभेच्छा दिल्या यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुंतीलाल कोठारी, सचिव गणेश गुंडाळ, सचिव प्राध्यापक माणिकराव विधाते, क्रिकेटपटू अनुप संकलेच्या, अशोक गुंजाळ, आनंदराव गारदे, अजय कविटकर, संदीप पडोळे, रोहित जैन, सागर खंडागळे, सुभाष येवले, घनश्याम सानप आदी उपस्थित होते.

सुंतीलाल कोठारी म्हणाले की मा आमदार अरुण काका जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुलींचं क्रिकेट संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रावांना झाला आहे मुलींना क्रिकेट स्पर्धेमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने पहिल्यांदाच मुलींसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असे ते म्हणाले

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version