Homeशहरमाजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या निवासस्थानी आगमन शहराध्यक्ष भैया गंधे यांच्या घरी...

माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या निवासस्थानी आगमन शहराध्यक्ष भैया गंधे यांच्या घरी सदिच्छ भेट देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उड्डाण पुलाच्या कार्यक्रमास उपस्थित

advertisement

अहमदनगर दि.१३ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील सक्कर चौक ते अशोका हॉटेल पर्यंतच्या पूर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नितीन गडकरी यांच्या समावेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील आमदार ,खासदारांच्या उपस्थितीत हा सोहळा नगर पुणे रोडवरील शिल्पा गार्डन येथे होणार आहे.

अनेक वर्षांच्या कालावधीनंतर नगरकरांचे उड्डाणपुलाचे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत आणि हळूहळू याची लांबी वाढत जात हा पूल अशोका हॉटेलपर्यंत पुरणत्वास आला आहे. यामुळे शहरातील काही रस्त्यांवर नेहमी होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत होईल.

या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे थेट भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानाजवळ हेलिकॉप्टरने उतरणार असून त्यानंतर कर्डिले यांच्या निवासस्थानी चहा पाण्याचा कार्यक्रम होणार आहे. तिथून पुढे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष भैया गंधे यांच्या घरी नितीन गडकरी सदिच्छा भेट देणार आहेत. आणि त्यानंतर चार वाजता शिल्पा गार्डन येथे कार्यक्रम स्थळी रवाना होतील अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली असून सायंकाळी चार वाजता उड्डाणपुलाचा शुभारंभाचा कार्यक्रमास विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होईल.

या कार्यक्रमाबाबत आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular