Homeक्राईमअर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण डॉक्टर निलेश शेळके याला जामीन मंजूर..

अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण डॉक्टर निलेश शेळके याला जामीन मंजूर..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 11 डिसेंबर
नगर अर्बन बँकेच्या कर्ज प्रकरणाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथे प्रतिष्ठित डॉक्टर निलेश शेळके याला अहमदनगर जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर झाला असून अटी आणि शर्तीवर तसेच कर्जफेड रकमेच्या परतफेड हमीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

२४ जून २०२४ रोजी आर्थिक गुन्हे विभागाच्या पथकाने डॉक्टर निलेश शेळके यास ताब्यात घेतले होते. नगर अर्बन बँकेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे या प्रकरणा संदर्भामध्ये बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा व अच्युत पिंगळे यांनी या बँकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. या प्रकरणासंदर्भामध्ये त्यांनी पाठपुरावा करत बँकेची फसवणूक ज्या ज्या लोकांनी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी सुद्धा केली होती. त्यानुसार
नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. डॉ. निलेश शेळके यांच्यावर या अगोदर सुद्धा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केलेली होती व त्यांना अटक केली होती. या प्रकरणांमध्येत्यांचा कर्जामध्ये सहभाग आहे त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करत तसेच इतर लोकांना
हाताशी धरून संगणमत करून त्यांनी मोठ्या
प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळा केलेला असल्याची माहिती तपासात आढळून आल्याने डॉक्टर निलेश शेळके याला पुन्हा पोलिसांनी अटक केली होती.

मंगळवारी जिल्हा न्यायालयाने डॉक्टर निलेश शेळके याला कर्ज रक्कम परतफेडीचे हमी वर जामीन मंजूर केला असून डॉक्टर निलेश शेळके यांच्या वतीने एडवोकेट महेश तवले एडवोकेट दुशिंग एडवोकेट संजय वालेकर यांनी काम पाहिले.

सुशील अग्रवाल ने 25 लाख जमा केलेअसून
संचालक अजय बोरा यांचे अटकपुर्व जामीन अर्जावर दोन्ही बाजू ने युक्तीवाद पुर्ण झाला असून बुधवारी न्यायालय या प्रकरणी निकाल देणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular