Homeराज्यखासदार विखे पाटील यांची यंत्रणा सत्यजित तांबे यांच्या प्रचाराला

खासदार विखे पाटील यांची यंत्रणा सत्यजित तांबे यांच्या प्रचाराला

advertisement

अहमदनगर दि.२९ जानेवारी (सार्थक थो)

अहमदनगर नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या निवडणुकीत यावर्षी प्रथमच चांगलीच चुरस पाहायला मिळाली आहे. या निवडणुकीच्या दरम्यान अनेक नाट्यमय घटना घडत असून काँग्रेसचे डॉक्टर सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा एबी फॉर्म येऊनही तो न भरता आपल्या मुलाचा अर्ज दाखल करून या निवडणुकीत ट्वीस्ट निर्माण केला होता. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भारतीय जनता पार्टी त्यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा आजपर्यंत झडत आहेत. यामध्येच भाजपच्या शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर या निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती.

निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून उद्या या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का नाही यावर याबाबत चर्चा झडत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समर्थक असलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांच्या प्रचाराचे स्टेटस व्हाट्सअप वर ठेवल्याने विखे पाटील यांची प्रचार यंत्रणा सत्यजित तांबे यांच्या साठी सक्रिय झाल्याची समोर आले आहे भाजपचे धनंजय जाधव विखे पाटील यांचे निकटवर्तीय निखिल वारे यांच्यासह खासदार सुजय विखे पाटील यांचे अनेक समर्थक सत्यजित तांबे यांचा डीपी ठेवून प्रचार करत असल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपने पाठिंबा दिला नसला तरी खा. सुजय विखे पाटील यांची यंत्रणा सत्यजित तांबे यांच्यासाठी कामाला लागल्याचे दिसून येतेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular