नेवासा ( विशेष प्रतिनिधी ) “करे हटवा तालुका वाचवा” असे फलक हाती धरत आज गुरुवार (दि. १) रोजी सकाळी कुकाणा ( kukana) येथे नेवाशाचे वादग्रस्त पोलिस निरीक्षक (police incepecteor)विजय करे यांचेवर कारवाई करावी यामागणीसाठी व्यापारी (business men) संघटनेच्यावतीने नेवासा-शेवगाव महामार्गावर(highway) तब्बल तासभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर युवक संघटनांचेवतीने पुकारण्यात आलेल्या कुकाणा बंदलाही कडकडीत बंद पाळून व्यापारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेवगाव उपविभागाचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी (dysp)संदिप मिटके यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. यावेळी आंदोलकांनी पोलीस निरीक्षक करे हे तालुक्यात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करून त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली.
कुकाण्यातील व्यापारी संघटनेच्यावतीने आज सकाळी निरीक्षक करे यांचे वाळु तस्कर संभाषण क्लिप प्रकरण लाचलुचपत कडे सोपवा, सीडीआर चोौकशी करा, कुकाण्यातील अवेैद्य धंदे बंद करा, खेसे पाटील दरोडयाचा तपास लावा या मागाण्यांसह कुकाणा येथे व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या गावगुंडांचे व करे यांची असलेली ‘मिलीभागात‘ याचीही चौकशी करावी अशीही मागणी केली.
Villagers protest against police inspecto Vijay Karan in Kukani, stop the road, traders and villagers also support the bandh
आंदोलकांनी प्रारंभी कुकाणा येथील तरवडी चौकातून सवाद्य निषेध फेरी काढली. “करे हटवा.. तालुका वाचवा” असे फलक आंदोलकांचा हाती झळकत होते. निषेध फेरी कुकाणा बस थांबा परिसरात येताच आंदोलकांनी नेवासा-शेवगाव रस्त्यावर एक तास रास्तारोको केला.
यावेळी भाजपाचे नेते चंपालाल बोरा,मनसेचे जिल्हा सचिव विलासराव देशमुख, व्यापारी संघटनेच्यावतीने जवाहर भंडारी, नेवासा येथील युवानेते माऊली तोडमल, महाराष्ट्र लहुजी सेनेचे भेैरवनाथ भारस्कर, मुस्लिम समाजाचे नेते रसुलभाई इनामदार, जाणता राजा ग्रुपचे राहुल जावळे, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र बागडे आदींनी वादग्रस्त पोलीस निरीक्षक करे (vijay kare)यांचे कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला.
मनेसेचे देशमुख यांनी कुकाण्यात सर्वजण गुण्यागोविंदानं राहत असतांना पोलीस निरिक्षकांनी काही झुंडशाही करणारांना पाठबळ देत असल्याने व्यापारीवर्गात असुरक्षितता असल्याचे व गुन्हेगारांना पुढे करुन समर्थनार्त आंदोलने करण्याचा उद्योग करत असल्याचे सांगितले सांगितले. व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ नेते अशोकराव चाेैधरी, अध्यक्ष सुभाष चौधरी, माजी सरपंच एकनाथ कावरे, शिवसेनेचे जावेद शेख राजेंद्र राऊत, विश्व हिंदू परिषदेचे सुशांत सोनवणे, अविनाश गुंफेकर, जाणताराजा मंडळाचे युनुस नालबंद, समीर पठाण, अक्षय कचरे, रामदास घुले, भाऊसाहेब हांडे, सुधीर मुनोत, बाबासाहेब गोल्हार, संदीप वाघ, सिद्धार्थ कावरे, महावीर गुंदेचा, अब्बास पटेल, प्रवीण विधाते, ऋषी तुपे, कुणाल धाडगे, आरबाज शेख, गणेश पुंड, आरेश तांबोळी, विशाल देव्हारे, वसीम शेख, सोनू शिंदे, शाहरुख शेख, विनोद जाधव, आरमान तांबोळी, निलेश जाधव, धनंजय गवळी, आलीम इनामदार, श्याम पंडित, मोनू शिंदे, प्रदीप सरोदे, शहानवाज सय्यद, गणेश गायकवाड आदींचा आंदोलनकर्त्यांत समावेश होता.
उपअधीक्षक मिटके यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी, नेवाशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव चोेैधरी, शनी शिगणापुरचे निरीक्षक रामचंद्र कर्पे, उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे, राज्य गुप्त वार्ताचे बी. एम. दरंदले यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
करे समर्थनार्थ आंदोलकांची सीआयडी चौकशी : विलासराव देशमुख
शिवसेना नेते स्वर्गीय अण्णा लष्करे हत्यातील आरोपी कोण आहेत हे सर्वांनाच माहीत असून वादग्रस्त पोलीस निरीक्षक विजय करे यांचे समर्थनार्थ कोण आंदोलन करणार आहेत याची चौकशी सीआयडी मार्फत व्हावी म्हणजे तालुक्यात कररे यांचे समर्थक कोण करत आहे हे उघड होईल. मागणी मनसेचे जिल्हा सचिव विलासराव देशमुख यांनी केली.
कोळपेंवर कारवाईची मागणी
व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवला असतांनाही बसस्टँड भागात कुकाणा दुरक्षेत्राचे हवालदार कोळपे यांनी काही दुकानदारांना दुकाने उघडण्यासाठी धकडपट केले. मात्र संतप्त व्यापार्यांनी त्यांना धुडकावले. भाषणातुनही वक्त्यांनी याचा उल्लेख करत या हवालदारावर कारवाईची मागणी केली.