Homeजिल्हाविनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात कसा झाला अधिक माहिती अली समोर

विनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात कसा झाला अधिक माहिती अली समोर

advertisement

मुंबई दि.१४ ऑगस्ट

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे हे पुण्यावरून मुंबई जात असताना खोपोली जवळ त्यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचे निधन झाले आहे मात्र हा अपघात नेमका कसा झाला याबाबत तर्कवितर्क लावले जात असून कोणत्यातरी वाहनाला विनायक मेटे यांचे वाहन मागून जाऊन धडकले चा प्राथमिक अंदाज आहे.

विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 ते 12  चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली असावी त्यामुळे  चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली.

 

या अपघाता वेळी मेटे यावेळी झोपेत असल्याने , त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून याची पाहणी करत आहेत. अपघाताच्या चौकशीसाठी 8 पथकं नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular