अहिल्यानगर दिनांक 28 ऑक्टोबर
अहिल्यानगर पोलिस दलात कार्यरत असलेल्या, महिला पोलिस हवालदार, अर्चना काळे यांनी दक्षिण आफ्रिका मधील केपटाऊन येथे झालेल्या वर्ल्ड क्लासिक अॅण्ड इक्च्व्हीप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत, ५७ किलो वजनी गटाचे भारताचे नेतृत्व करीत, अनुक्रमे चार सिल्व्हर पदके आणि १ सुवर्णपदक मिळविले आहे,सदर स्पर्धेत 23 देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता, ही स्पर्धा दहा ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान पार पडली.

पोलिस महिला हवालदार अर्चना काळे यांनी अहिल्यानगर पोलिस दलाची मान उंचावून स्पर्धेत मिळवलेल्या यशा बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काळे यांचे कौतुक केले आहे,
या स्पर्धेसाठी अर्चना काळे यांना विजय कनोजिया, ओंकार गुर्रम, अरविंद भिंगारदिवे यांचे मागदर्शन लाभले आहे.





