अकोले दि.३ नोव्हेंबर
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथे एका अवैघ दारू विक्री करणाऱ्या घरात छापा मारून 39 हजार 340 रुपयाचा देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने केली आहे.

दारू विक्री करणाऱ्या संजय आदरनाथ शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे मात्र शुक्ला हा सराईत आरोपी असून त्याच्यावर राजुर पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत त्याला अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी केली होती मात्र तो पुन्हा परत आल्यानंतर अवैध धंदे पुन्हा सुरू केले असल्याचं पुन्हा उघडकीस आले आहे.
पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात एक धक्कादायक गोष्ट समोर आली असून शुक्ला याच्या घरात तळघरात दारूच्या बाटल्यांचे बॉक्स लपून ठेवल्याचं आढळून आलं प्रथमदर्शनी पाहणाऱ्याला त्या ठिकाणी काहीच दिसून येत नाही मात्र फारशी उचलली तर एखादा हौद असेल असे वाट्ते मात्र त्या ठिकाणी तळघरात शुक्लाहा दारूचे बॉक्स लपवत होता.
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहोम, ASI बशीर तडवी पो.हवा.शकील अहमद शेख , प्रमोद मंडलिक , महिला पोलीस कर्मचारी छाया गायकवाड यांनी केली आहे.





