अहमदनगर दि.८ ऑक्टोबर
अहमदनगर शहरालगतच्या भिंगार परिसरातील लष्करी हद्दीच्या आसपास नवीन बांधकाम करायचे असल्यास लष्कर विभागाकडून ना हरकत दाखला देण्यात येतो.तो दाखला नगर भाग उपविभागीय कार्यालया कडे दिल्या नंतर त्याची पुन्हा पडताळणी झाल्या नंतर पुढील कार्यवाही होत असते ही मोठी वेळखाऊ प्रक्रिया असल्याने अनेक जण एजंट मार्फत ही प्रक्रिया करत असतात.महसूल विभागाच्या आवारात या एजंटांचा राबता असतो.
संरक्षण विभागाकडून हे दाखल्याचे पत्र येत असल्याने दाखला सर्व तपासणी केल्यानंतरच देण्यात येत असतो. मात्र असाच दाखला बनावट करून तो नगरच्या उपविभागीय कार्यालयाला देण्यात आला होता. मात्र ज्या प्रकरणात सध्या लष्कराच्या संबंधित विभागातील एक कर्मचारी राजा ठाकूर आणि रोहन धेंडवाल दोन जणांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एक लष्कराच्या अंतर्गत कार्यालयात करणारा कर्मचारी तर त्याचा मित्र हा खाजगी इसम आहे मात्र या व्यतिरिक्त उपविभागीय कार्यालयामध्ये वावरणारे एजंट या या प्रकरणांमधून कुठे गायब झाले हे अद्यापही समजलेले नाही. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दिलेल्या नियोजनात तसेच तक्रारीमध्ये काही प्लॉट धारकांची नावे घेण्यात आली आहेत. या प्लॉट धारकांचा एजंट गणेश सध्या कुठे गायब आहे. कारण या गणेशची चौकशी कोतवाली पोलिसांनी केली होती. मात्र या चौकशीनंतर पुढे काय झाले याबाबत कोणालाच काही माहिती नाही गणेश चा आशीर्वाद कोणाकोणाला मिळाला आणि गणेशाचा प्रसाद खाऊन कोण कोण पावन झाले याबाबत चर्चेला उधाण आले आहे. मात्र या प्रकरणी आता देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
हे प्रकरण अत्यंत गंभीर असून थेट देशाच्या संरक्षण विभागाची छेडछाड करण्यात आली आहे. या प्रकरणातील गणेश नावाच्या एजंट बद्दल सध्या चांगली चर्चा होत असून हा गणेशचा महसूल कार्यालयात रोजचा राबता असतो तसेच विशेष विभागात त्याची रोजच ये जा असते मागील काही दिवसांचे सीसीटीव्ही तपासले असता त्याचा राबता या ठिकाणी आढळून येऊ शकतो त्यामुळे या गणेश बाबत पोलिसांनी अधिक चौकशी करावी अशी मागणी आता पुढे येत आहे. बनावट एनओसी प्रकरणात ज्या प्लॉट धारकांनी प्रांत कार्यालयाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील कोणाचे कोणते एजंट होते याची तपासणी करणे गरजेचे आहे कारण अनेक प्रकरणे हे एजंट मार्फतच प्रांत कार्यालयात येत असतात त्यामुळे एजंटांची चौकशी होणे गरजेचे आहे.
आता हे प्रकरण कोतवाली पोलिसांकडून थेट शहर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तपासासाठी दिले आहे. या प्रकरणात रोहन धेंडवाल याला 10 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे. त्यामुळे आता राजा ठाकूर आणि रोहन धेंडवाल यांच्याकडून या साखळीत अजून कोण कोण सहभागी आहे याबाबत पोलीस तपास करणार आहेत.