HomeUncategorizedपालकांनो इकडे लक्ष द्या आपला मुलगा मुलगी काय करतेय…नगरमध्ये तरुणाई गेली गांजाच्या...

पालकांनो इकडे लक्ष द्या आपला मुलगा मुलगी काय करतेय…नगरमध्ये तरुणाई गेली गांजाच्या आहारी.. तरुणांबरोबर तरुणींचेही दम मारो दम…कॅफेच्या पडद्याआड नंगानाच…

advertisement

अहमदनगर दि. १७ सप्टेंबर
अहमदनगर शहरात तीन दिवसांपूर्वी तीन मुली घरातून निघून गेल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे या घटनेनंतर समोर आले आहेत मात्र या प्रकरणी आता एका इसमावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय. हे प्रकरण जेवढे दिसते तेवढे साधे सोपे नाही मात्र या प्रकरणानंतर अनेक धक्कादायक गोष्टी पोलीस तपासात समोर आल्या आहेत. त्यामुळे आपल्या घरातील अल्पवयीन मुले मुली नेमकं काय करतात याकडे प्रत्येक पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. एखादी वाईट संगत आपल्या मुला मुलींना अत्यंत वाईट मार्गावर जाण्यास मदत करत नाहीत ना! याकरता पालकांनी आपली मुलं नेमकं कोठे जातात कोणा बरोबर राहतात याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. आज-काल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असल्यामुळे या मोबाईलमुळेच अनेक गंभीर समस्या आता प्रत्येक घराघरात उभा ठाकल्या आहेत.

आज-काल मोबाईल मुळे आणि मोबाईलवर येणाऱ्या विविध व्हिडिओ ,इंस्टाग्राम यामुळे वेगळेपणा दाखवण्याच्या नादात तरुण पिढी चुकीच्या मार्गाला जात आहे. त्याचप्रमाणे आता प्रत्येक गोष्टीची गरज असल्यामुळे एकदा तरी आपण करून पाहू या भावनेतून अनेक जण व्यसनांच्या आहारी जात आहेत. अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील आकाशवाणी केंद्र जवळ असणाऱ्या नाट्यगृहाच्या इमारतीच्या बाजूला गांजा अड्डा सुरू आहे या ठिकाणी अनेक तरुण-तरुणी गांजा सिगरेट व्होडका पिताना सर्रास आढळून येतात. त्याचप्रमाणे गुलमोहर रोडवरील एका मोकळ्या मैदानावर असाच गांजाचा अड्डा सुरू असून या ठिकाणी अनेक तरुणी दिवसा गांजा सिगरेट दारू पितानाचे चित्र आजही पाहायला मिळतेय.

शहरात विविध कॅफे असून या कॅफेमध्ये सध्या नंगानाच सुरू आहे. कॅफेमध्ये पडद्याआड नेमकं काय चालते हे पाहिलं तर अत्यंत भयानक चित्र समोर येऊ शकते. मात्र काहीही घटना घडली तर याचा आरोप पोलिसांच्या माथी टेकून सर्वच समाज पोलिसांना टारगेट करत असतात मात्र त्याआधी या घटना साठी आपण किती जबाबदार आहोत याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कोणतीही घटना ही अचानक होत नसते कुठून तरी या घटनेला सुरुवात होत असते त्यामुळे पालकांनी आपली मुलगी अथवा मुलगा नेमका काय करतोय हे पाहणं गरजेचं आहे. एखादी चूकही आपल्या मुला-मुलींना आयुष्यभर बरबाद करू शकते.

पुणे मुंबई आणि मेट्रो सिटी मधील चांगले नाही पण वाईट सवयी नगर शहरात आपली मुळे पक्के करू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. अनेक व्यसने अशी आहेत की ते व्यसन केल्यानंतर त्याचा वासही येत नाही त्यामुळे अनेक तरुण तरुणी अशा व्यसनाच्या आहारी जाऊ लागले आहेत. इंजेक्शन द्वारे पावडर द्वारे व्यसन करून वेगळ्याच धुंदीत तरुणाई असून आपल्या मुला मुलांनी चुकीचे पाऊल टाकू नये या करीता आता पालकांनी डोळ्यात अंजन घालून लक्ष देणे गरजेचे आहे.

या व्यसनांमधून पुढे गुन्हेगारी वाढत जाते त्यामुळे पोलिसांनाही या गोष्टींचा मोठा त्रास असतोच मात्र पोलीस बळ कमी असल्याने आणि लोकशाहीला ममानणारा आपला देश असल्याने अनेक वेळा कारवाई करताना पोलिसांनाही हात अखडते घ्यावे लागत असतात. त्यामुळे आपला मुलगा मुलगी आपली जबाबदारी या भावनेतून प्रत्येकाने आपलं घर सांभाळलं तर निश्चितच गुन्हेगारी कमी होईल आणि आपले मुलं मुली चांगल्या मार्गाला जातील अन्यथा पालकांवर पश्चाताप करण्याशिवाय दुसरे हाती काहीच राहणार नाही.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular