शिर्डी
साई संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला असून उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती रद्द करून राज्य सरकारने जाहीर केलेल्या विश्वस्त मंडळाला मान्यता मिळाली आहे. तसेच नवीन विश्वस्त मंडळाने लवकरात लवकर पदभार घेण्याचाही आदेश देण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत आमदार आशुतोष काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत. नवीन अध्यक्षासह इतर विश्वासांना पदभार घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.