अहमदनगर दि.३१ मार्च
ताबा प्रकारा बाबत आता लोकजागृती होऊ लागली असून नागरीक आता पोलिसांकडे जाण्याची हिम्मत दाखवू लागले आहेत. काही दिवसातच ताबा गुंडांचे खरे चेहरे समाज समोर येणार आहेत.
औरंगाबाद रोड वरील एका प्लॉट वरील ताब्या नंतर मूळ मालकाने पोलिसांकडे धाव घेतली होती मात्र त्यांना ठाण्यात नाही मात्र पोलीस अधीक्षक कार्यलयात न्याय मिळाला असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे . जेव्हा आपल्या जमिनीवर ताबा मारल्याचा लक्षात येताच मूळ मालकाने ठाण्यात धाव घेतली होती मात्र सदैव पांढऱ्या कपड्यात असणाऱ्या त्याने तक्रार न देता तुम्ही ताबेवाल्याशी बैठक घ्या म्हणून आग्रह करत होता मात्र जेव्हा तक्रारदार पोलीस अधीक्षक कार्यालयात गेला तेव्हा त्याला बऱ्या पैकी दिलासा मिळाला.
तर दुसऱ्या प्रकरणात अमूलबटरने मध्यस्ती करत घोडेगावचे पाणी वैदयकीय व्यवसायिकास पाजून चांगलाच चुना लावला आहे यात एक मोठा राजकीय नेता विनाकारण गुंतला असल्याचं दिसतंय.
ताबा प्रकार दिसतो तेवढा सोपा नाही यात गुंड असतात असे नाही व्हाईट कॉलर आणि सरकारचा पगार घेणारे मोठं मोठे माणसे सामील असतात जमीन मोजणी पासूनच हा खेळ चालू होतो आधी उतारा मग जमीन मोजणी आणि मालक शहारत नसेल तर ताबा आणि माध्यस्तीला अनेक कावळे तयार असतात अशी भलीमोठी साखळी यात ताबा प्रकारात असते.
औरबगाबाद रोड मधील ताबा प्रकरणात त्या पांढऱ्या कपड्यात वावरणाऱ्या विरोधात तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे ज्याने न्याय द्यायचा त्यानेच बैठकीचे आमंत्रण द्यावे हे न पटणारे आहे.