Home राजकारण अर्बन चे किंगमेकर सुवेंद्र गांधींच, सत्तेची चावी पुन्हा एकदा सहकारकडेच

अर्बन चे किंगमेकर सुवेंद्र गांधींच, सत्तेची चावी पुन्हा एकदा सहकारकडेच

अहमदनगर-
नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असूनसहकार पॅनेलच्या सर्वसाधारण मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी विजयी मिळवला आहे . माजी खासदार स्व.दिलीप गांधी प्रणित सहकार मंडळाच्या दहा उमेदवारांनी १५ हजाराच्या पुढे मत घेत विजय मिळविला या विजयामुळे स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी त्यांच्यावरचा विश्वास पुन्हा मतदारांनी दाखवला असल्याचं या मतदाना वरून स्पष्ट होत आहे. सत्तेची चावी पुन्हा सहकार मंडळाकडे म्हणजेच स्व. दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांच्याकडे अली आहे. मतदान आधी गेले वर्षभर अर्बन बँक बचाव कृती समितीने बँकेतील भ्रष्टाचाराचे पुरावे सोशल मीडियावर प्रसारित करून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडले होते त्यामुळे या निवडणुकीत नगर अर्बन बँक बचाव समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. मात्र निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोणती जादू झाली हे कळलेच नाही आणि अर्बन बँक बचाव कृती समिती या निवडणुकीतूंन बाहेर पडली आणि पुन्हा सूत्र माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुरेंद्र यांच्याकडे अली आणि अखेर तेच या निवडणुकीचे खरे किंगमेकर ठरले.
पहा कोणाला किती मतदान झाले

अजय अमृतलाल बोरा १६३२३
अनिल चंदूलाल कोठारी १६१७४
ईश्वर बाबूशेठ बोरा १६१४९
गिरीष केदारनाथ लाहोटी १५७३८
दीप्ती सुवेंद्र गांधी १६१७१
राजेंद्र आत्माराम आग्रवाल १५८६१
महेंद्र मोहिनीराज गंधे १५८८५
राहुल नरेंद्र जामगावकर १५८०६
शैलेश सुरेश मुनोत १५९६३
संपतलाल धनराज बोरा १५३२५
स्मिता महावीर पोखरणा १५६६
संजय शिवाजी डापसे १०३९
संपतलाल धनराज बोरा १५३२५

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version