Home विशेष असाध्य आजारावर मोफत होमिओपॅथीक चिकित्सा व उपचार:अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हाॅस्पिटल...

असाध्य आजारावर मोफत होमिओपॅथीक चिकित्सा व उपचार:अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हाॅस्पिटल अहमदनगर चा उपक्रम*

Created with GIMP

अहमदनगर दि.२० जानेवारी

अहमदनगर होमिओपॅथीक शिक्षण संस्थेचे अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हाॅस्पिटल  द्वारा चालविण्यात येणारया २५ खाटांच्या सुसज्ज होमिओपॅथीक हाॅस्पिटल मधिल बाह्यरूगणालयात सर्वांसाठी असाध्य आजारांवर मोफत होमिओपॅथीक चिकित्सा व उपचार उपलब्ध असल्याची माहिती प्राचार्य व रूग्णालयीन अधीक्षक डाॅ सुनिल पवार यांनी दिली.

सदर सुविधे अंतर्गत रूग्णांची सखोल होमिओपॅथीक चिकित्सा करून आठ दिवसांचे होमिओपॅथीक औषध मोफत दिले जाते. केवळ रूग्णाच्या हिताचा व समाजाची सेवा करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डाॅ भुषण अनभुले यांना दिली.

महाविद्यालयाच्या होमिओपॅथीक हाॅस्पिटल मध्ये अनुभवी व उच्च शिक्षित होमिओपॅथीक चिकित्सक कार्यरत असुन ह्या संधिचा सर्वांनी नोंद घ्यावी व लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष डाॅ भुषण अनभुले, उपाध्यक्ष श्री भुषण चंगेडे, सचिव डाॅ. डि.एस.पवार, सहसचिव श्री लक्ष्मीनिवास सारडा, खजिनदार डाॅ विलास सोनवणे, संचालक श्री शिवाजी रणसिंग, श्री राजेंद्र बोरा, श्री अभय मुथा, श्री डाॅ समीर होळकर, श्री राजेंद्र मेहेत्रे, डाॅ रुतुजा चव्हाण, प्राचार्य डाॅ सुनिल पवार आणि आर एम ओ डाॅ माधुरी मोरे यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version