अहमदनगर दि.८ एप्रिल
अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशन ने सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे दाखल केलेला स्कीम अर्ज मंजूर होऊन संस्थेचे प्रथम विश्वस्त मंडळ पाच वर्षाच्या मुदतीकरिता सहाय्यक धर्मदाय आयुक्त सातव यांचे आदेशानुसार जाहीर करण्यात आले आहे. सदर आदेशान्वये संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा व संचालक मंडळ हे बरखास्त झाले असून त्यांच्यामार्फत केलेल्या अनागोंदी कारभारावर टाच येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
संस्थेच्या आडते बाजार येथील कार्यालयाचे बांधकाम अध्यक्ष राजेंद्र चोपडा व संचालक मंडळ यांनी विना परवाना सुरू केल्याचा आरोप काही सभासदांनी केला असून संस्थेला लाखो रूपयांचे नुकसानही या कारणाने होण्याची शक्यता निर्माण झाल्याची श्याक्यात काही सभासदांनी बोलून दाखवली आहे. त्याबाबतही शहरातील व्यापाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगायला सुरवात झालेली आहे. संस्थेच्या तांत्रिक दृष्ट्या अडचणींचा फायदा घेत राजेंद्र चोपडा व सहकारी यांनी सभासदांच्या मर्जी विना स्वयंघोषित पद्धतीने अध्यक्ष व संचालक मंडळ चे काम काज हाती घेतले असा आरोप विरोधी मंडळाच्या सभासदांनी केलाय.
याबाबत सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी संस्थेचे प्रथम विश्वस्त संतोष कनकमल बोरा यांच्याद्वारे दाखल चौकशीअंती घटना मंजूर करत अध्यक्ष व सहकारी संचालक मंडळास मोठी चपराक लावली आहे. संस्थेचे प्रथम विश्वस्त मंडळ म्हणून झुंबरलाल घेवरचंद बोथरा, अशोक रामलाल गांधी, प्रेमराज धनराज पितळे, संतोष कनकमल बोरा, शांतीलाल मोतीलाल गांधी, हस्तीमल मुथ्था, मनीष तलकसी सावला, दीपक ताराचंद बोथरा, गोपाल गंगाबिसन मिनियार, राजेंद्र पन्नालाल डागा, सुशील कुमार वसंतलाल भळगट, हिरालाल झुंबरलाल चोपडा, प्रकाश गोविंदराव सावंत, विश्वनाथ केदारनाथ कासट, अजित शांतीलाल भंडारी, सतीशलाल आनंदराम गुंदेचा, शैलेश पोपटलाल गांधी यांची निवड करण्यात आली आहे.
सदर विश्वस्त मंडळाने सहा महिन्याच्या आत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून सर्वसाधारण सभेत सभासदांकडून मंजूर करून तशी नोंद धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात करून घ्यावी असा आदेश सहाय्यक धर्मदाय आयुक्त सातव यांनी दिला आहे. सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या या निर्णयामुळे आडते बाजार व मार्केट यार्ड येथील व्यापारी वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी वर्गाच्या वतीने ऍड. पांडुरंग बल्लाळ यांनी कामकाज पाहिले.